घरक्राइमनगरमध्ये शिंदे गट आणि भाजप नेत्यांमध्ये तुफान राडा; दगडफेकीमुळे परिसरात तणाव

नगरमध्ये शिंदे गट आणि भाजप नेत्यांमध्ये तुफान राडा; दगडफेकीमुळे परिसरात तणाव

Subscribe

अहमदनगरमध्ये एका लग्नसमारंभात शिंदे गट आणि भाजप नेते आपापसात भिडल्याचं समोर आले आहे.
एकमेकांना खुन्नस दिल्याच्या रागातून दोन्ही गटातील नेत्यांमध्ये हा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर भाजप नेते आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलाने शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांच्या मुलाच्या हॉटेलवर दगडफेक केली ज्यामुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या राड्यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी नगर – पुणे महामार्ग रोकून धरल्याने महामार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

नेमकं घडलं काय?

भाजप नेते आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांचा मुलगा अक्षय कर्डीले केडगावमधील एका लग्नसमारंभासाठी गेला होता. यावेळी शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांच्या मुलाशी त्याची नजरानजर झाली, यावेळी दोघांनी एकमेकांवर खुन्नस दिल्याच्या आरोप केला. यानंतर लग्नसमारंभ पार पडल्यानंतर अक्षय कर्डीलेने कार्यकर्त्यांसह दिलीप सातपुते यांच्या मुलाच्या केडगावमधील हॉटेलवर तुफान दगडफेक केली, दरम्यान सातपुते यांच्या समर्थकांनीही कर्डीलेंच्या समर्थकांवर दगडफेक करत प्रत्युत्तकर दिले. यामुळे शहरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.

- Advertisement -

अहमदनगरमधील केडगावमध्ये झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी घेत सर्व आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या या प्रकरणातील हस्तक्षेपानंतर सर्व वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे. राडा आणि दगडफेकीच्या घटनेनंतर परिसरातील तणावपूर्ण वातावरण आता शांत झाले आहे.


बीबीसीच्या कार्यालयाची चौकशी सुरूच, आयटी अधिकारी आणि संपादकांमध्ये वादंग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -