स्वच्छ आणि आरोग्यदायी मुंबई! मॉर्निंग वॉकसाठी रात्रीच होणार मैदानांची साफसफाई

मुंबईतील अनेक मैदानात मॉर्निंग वॉकसाठी मुंबईकरांची गर्दी होते. अशा महत्त्वाच्या ठिकाणांची आता रात्रीच्या वेळी सफाई करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदान, मरीन ड्राईव्हसारख्या ठिकाणी ही सफाई करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना स्वच्छ आणि धूळमुक्त वातावरणात मॉर्निंग वॉक करता येईल.

morning-walk

मुंबई – मुंबईकरांना आता स्वच्छ आणि धुळमुक्त वातावरणात मॉर्निंग वॉक (Morning Walk) करता येणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेने विशेष योजना राबवली आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदानासह मुंबईतील अनेक मैदानांवर आता रात्रीच साफ-सफाईचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉक करायला येणाऱ्या मुंबईकरांना स्वच्छ वातावणाचा आनंद घेता येईल. त्यामुळे त्यांचे आरोग्य अधिक सुधारले जाईल. (Morning Walk in Mumbai)

हेही वाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1032 अभियंत्यांना नियुक्तीपत्र प्रदान, 111 उमेदवारांनाही दिली ग्वाही

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पहाटेपासून मुंबई स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले जाते. मुंबईतील रस्त्यांवर हातात झाडू घेऊन साफसफाई करणारे अनेक कामगार आपल्याला दिसतात. सफाई सुरू असताना परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य निर्माण झालेलं असतं. त्यामुळे कामाच्यानिमित्ताने आणि मॉर्निंग वॉकसाठी बाहेर निघणाऱ्या मुंबईकरांना धुळीचा सामना करावा लागतो. मात्र, आता रात्रीच्या पाळीतही मुंबई स्वच्छ करण्यात येणार आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या मुंबईकरांना स्वच्छ आणि धुळमुक्त मुंबईचा आनंद घेता येणार आहे. घनकचरा विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांनी ही माहिती दिली.

मुंबईतील अनेक मैदानात मॉर्निंग वॉकसाठी मुंबईकरांची गर्दी होते. अशा महत्त्वाच्या ठिकाणांची आता रात्रीच्या वेळी सफाई करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदान, मरीन ड्राईव्हसारख्या ठिकाणी ही सफाई करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना स्वच्छ आणि धूळमुक्त वातावरणात मॉर्निंग वॉक करता येईल.

हेही वाचा – १११ उमेदवारांच्या ईडब्ल्यूएस नियुक्तीस हायकोर्टाची स्थगिती

गेल्या काही दिवसांत मुंबईतील कचऱ्याचे प्रमाण घटले आहे. मुंबई पालिकेकडून २ ऑक्टोबर २०१७ पासून कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचा नियम आणल्यामुळे मुंबई अधिक स्वच्छ झाली आहे.

घनकचरा व्यवस्थापनेचा काय आहे नियम

२० हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या गृहनिर्माण सोसायच्या आणि १०० किलोंपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या इमारती आणि आस्थापनांना कचऱ्याच्या विल्हेवाटीचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणाऱ्या सोसायट्यांना मालमत्ता करांत १० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येते. त्यामुळे अडीच वर्षांपूर्वी साडेसात हजार मेट्रिक टनांपर्यंत कचरा निर्माण व्हायचा. आता हे प्रमाण साडेसहा मेट्रिक टनांपर्यंत आले आहे.