पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी संजय राठोडांना क्लिनचिट?

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात सर्व बाजूने तपास करण्यात आला. या तपासात तिची हत्या झाले नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणी अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

Sanjay Rathod and Pooja Chavan

टीकटॉक स्टार पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी शिवसेना नेते संजय राठोड यांना क्लिनचिट मिळण्याची शक्यता आहे. पूजा चव्हाण हिचा मृत्यू हत्येमुळे झाला नसून अकस्मात असल्याचं स्पष्ट झालं आहे. पुणे पोलिसांच्या समरी अहवालात हे स्पष्ट झालं आहे. (Clean chit to Sanjay Rathore in Pooja Chavan death case?)

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात सर्व बाजूने तपास करण्यात आला. या तपासात तिची हत्या झाले नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणी अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा – पंकजा मुंडें समर्थकांनी प्रवीण दरेकरांचा ताफा अडवला, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

या मृत्यूप्रकरणी अहवाल २१ एप्रिल २०२२ रोजी गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता, असं पोलीस उपायुक्त नम्रता पाटील म्हणाल्या. त्यानंतर, पंधरा दिवसांच्या मुदतीत त्यावर कोणीही आक्षेप नोंदवला नाही. त्यामुळे समरी अहवाल वानवडी सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी हे प्रकरण अकस्मात मृत्यू म्हणून दाखल केला आहे. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींचे जबाब, मृत मुलीचे आई-वडील, नातेवाईक यांचे जबाब, फॉरेन्सिक अहवाल याचीही तपासणी करण्यात आली होती.

हेही वाचा – “युपीचा बाबू ४४ मते घेऊन गेला, वाघाचे कातडे पांघरलेला बाबू ४१ मतांवरच थांबला”

पूजा चव्हाण ही मूळची बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील राहणारी होती. इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स करण्यासाठी पुण्यात गेली होती. दरम्यान, ती टिकटॉकमुळे प्रकाशझोतात आली. ८ फेब्रुवारी २०२२ रोजी तिने इमारतीतून उडी घेत आत्महत्या केली. त्यानंतर, १२ ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली. त्यामुळे शिवसेना नेते संजय राठोड यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं.

हेही वाचा – लवकरच दूध का दूध, पाणी का पाणी होणार; राज्यसभेच्या निकालावरून नाना पटोलेंचा इशारा

दरम्यान, संजय राठोड यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी मागणी पोहरादेवी येथील सहा संत तसेच अखिल भारतीय बंजारा सेवा संघाने केली आहे. मागणी करणाऱ्यांत बाबूसिंह महाराज, कबीरदास महाराज, सुनील महाराज, जितू महाराज, यशवंत महाराज, शेखर महाराज आदींचा समावेश आहे.