घरठाणेनेरूळ रेल्वेस्थानकावर राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित स्वच्छता मोहीम

नेरूळ रेल्वेस्थानकावर राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित स्वच्छता मोहीम

Subscribe

२४ सप्टेंबर, २०२२ राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस) स्थापना दिवसाचे औचित्य साधून, नेरूळ रेल्वे स्थानकावर सकाळी १० ते १ च्या सुमारास स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ह्या मोहिमेत एस आई ई एस (नेरुळ) कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स ऍण्ड कॉमर्स मधिल राष्ट्रीय सेवा योजनेचे १०० स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी कामिनी ठाकूर, चैतन्य सोंगिरकर व मीनल सरोदे तसेच नेरुळ रेल्वे स्थानक व्यवस्थापक साचीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छ्ता मोहीम राबवली गेली.

या मोहिमेत कार्यकर्ते म्हणून प्रथम व द्वितीय वर्षीय मुलांनी हिरिरीने सहभाग घेतला. कचरा, भिंतीवर चिटकवलेल्या जाहिराती यामुळे अस्वच्छ झालेले नेरूळ रेल्वे स्थानक रोजच्या धावपळीत दुर्लक्षित राहिल्याचे दिसून आले. नेरूळ स्थानक वर – वरून जरी स्वच्छ दिसत असले तरीही कर्मचाऱ्यांना मदतीची गरज भासत होती. ह्यावेळी एन एस एस संघाने मदतीचा हात पुढे केला. पूर्व व पश्चिम मार्गाला जोडणाऱ्या पुलावर झाडलोटी चे काम सर्वात प्रथम करण्यात आले. पुढे भिंती घासण्यात आल्या आणि जमिनीवर फिनईल टाकून स्वच्छ करण्यात आले. त्याचबरोबर कचरा व्यवस्थापन व प्रदूषण या विषयावर एक पथनाट्य स्वयंसेवकांनी नेरुळ रेल्वे स्थानकावर सादर केले

- Advertisement -

एस आई ई एस (नेरुळ) कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स ऍण्ड कॉमर्स मधील राष्ट्रीय सेवा योजनएचे स्वयंसेवक नेहमीच वृक्षारोपण, रक्त दान शिबिर, लसिकरण, स्वच्छ्ता मोहीम अश्या विविध उपक्रमांमध्ये नेहमीच आग्रेसर असतात. महाविद्यालयात घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात राष्ट्रीय सेवा योजनएचे स्वयंसेवक उत्तम कामगिरी बजावतात.


हेही वाचा : पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर, चंद्रकांतदादांकडे पुणे, केसरकरांकडे मुंबई

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -