घरमहाराष्ट्रसहा हजार शिक्षण सेवकांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा

सहा हजार शिक्षण सेवकांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा

Subscribe

ऊर्जा विभागापाठोपाठ आता शिक्षण विभागानेही रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला असून लवकरच तब्बल ६ हजार १०० शिक्षण सेवकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक वर्षा पासून रिक्त असणाऱ्या शिक्षकांची पदभरती करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये तसेच पदभरती बंदीतून शिक्षण सेवा वगळण्यात यावी यासाठी वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठवपुरावा करत त्यांना पत्र लिहले होते. यांनतर मान्यता मिळाल्यानंतर पदभरतीचा मार्ग आता मोकळा झाल्याचे वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन सांगितले आहे. ऊर्जा विभागापाठोपाठ आता शिक्षण विभागानेही रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला असून लवकरच तब्बल ६ हजार १०० शिक्षण सेवकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. अशी माहिती त्यांनी दिली आहे.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित,अंशतः अनुदानित व विनाअनुदानित, अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक,उच्च प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांतील,शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी.एल.एड.कॉलेज) शिक्षकांची सुमारे ६१०० रिक्त पदं भरली जातील.“अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये “अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेत उच्चतम गुण मिळवणा-या उमेदवारांची मुलाखत घेऊन त्या आधारे अंतिम निवड करण्यात येणार आहे.सदर पदभरतीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबतचे निर्देश शिक्षण आयुक्तांना दिले असल्याची महत्वपुर्ण बातमी समोर येत आहे.

- Advertisement -

 



हे हि वाचा – प्रकाश आंबेडकर तीन महिन्यांच्या रजेवर, रेखा ठाकूर यांच्याकडे वंचितचे प्रभारी अध्यक्ष पद

- Advertisement -


 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -