घरमहाराष्ट्रऐन गणेशोत्सवात सोलापुरात मश्रूम गणपती मंदिरावरील २४ तोळ्यांचा कळस चोरीला, ग्रामस्थ संतप्त

ऐन गणेशोत्सवात सोलापुरात मश्रूम गणपती मंदिरावरील २४ तोळ्यांचा कळस चोरीला, ग्रामस्थ संतप्त

Subscribe

सोलापूर – सोलापूरातील प्रसिद्ध मश्रूम गणपती मंदिरावरील सोन्याचा कळस चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. हा कळस २४ तोळ्यांचा होता. मध्यरात्री अंधराचा फायदा घेत चोरट्याने कळसाची चोरी केली. त्यामुळे याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी भाविकांकडून केली जातेय. महत्त्वाचं म्हणजे २०१७ सालीही या मंदिराचा कळस चोरीला गेला होता. त्यानंतर पुन्हा पाच वर्षांनी कळस चोरीला गेल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील हिप्परगा गावात मश्रूम गणपतीचं मंदिर आहे. मश्रूम गणपती मंदिरावर नेहमीच भक्तांची गर्दी होत असते. गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ झाल्याने येथे यानिमित्ताने गर्दी होते. मात्र, मध्यरात्री चोरीचा प्रकार झाल्याने इथल्या सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं स्पष्ट दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ऐतिहासिक मूर्तीचा शोध घेण्यासाठी अधिक पोलीस बळाचा वापर करा, अंबादास दानवे यांची मागणी

दरम्यान, मंदिरावर सोन्याचा कळस बनवण्यासाठी भाविकांनी देणगी दिली होती. या देणगीतूनच तब्बल २४ तोळ्यांचा कळस बनवण्यात आला होता. मंदिरावर सोन्याचा कळस असतानाही मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरट्यांनी संधी साधली. त्यामुळे नेमकी चोरी कोणी केली याचा शोध लागलेला नाही. पोलीस याची कसून चौकशी करत आहेत.

- Advertisement -

२०१७ सालीही याच मंदिरावरील कळस चोरीला गेला होता. आता त्यानंतर पाच वर्षानंतर पुन्हा कळस चोरीला गेल्याने भाविकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -