घरताज्या घडामोडीWeather Forecast : मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता

Weather Forecast : मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून राज्यांत पावसाच्या हलक्या सरी बसरत आहेत. मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि राज्यातील काही भागांत सकाळी ९.४५ मिनिटांनी ढगाळ वातावरण तयार झाले होते. तसेच पहाटेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी सुद्धा बरसल्या आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग, गोवा, ठाणे आणि पुणे शहरांत पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह पावसाच्या हलक्या सरी

शनिवारी आणि रविवारी मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला होता. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम असल्याचं चित्र आहे. परंतु आज राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, काल(शनिवार) राज्यांत मुंबई, ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा पाऊस पडला. मात्र, आज पुणे, उत्तर कोकण , भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

- Advertisement -

दिल्लीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस

दिल्लीत पावसाने रेकॉर्ड ब्रेक केला आहे. थंडीच्या वातावरणात शनिवारी झालेल्या पावसाने ३२ वर्षांचा विक्रम मोडून काढलाय. जानेवारी महिन्यात ६९.८ मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. राष्ट्रीय राजधानीच्या नरेला भागात ८.५, नजफगडमध्ये १०.०, आर्यनगरमध्ये १९.०. लोधी रोड १८.०, सफदरगंज १९.३ आणि पालम १९.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

आज रविवारीही पावसाची शक्यता असून कमाल तापमान १६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दिल्लीसह गाझियाबाद, फरिदाबाद, नोएडा आणि गुरुग्राममध्येही मुसळधार पाऊस सुरू असून पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्येही पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

विदर्भातील काही भागांत पुढील पाच दिवसांसाठी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.


हेही वाचा : Omicron Variant: ओमिक्रॉनचा कहर! न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी चक्क स्वतःचं लग्न केलं रद्द


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -