घरमहाराष्ट्रमाजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकरांवर अतिक्रमणाचा आरोप; मुंबई महापालिकेने बजावली नोटीस

माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकरांवर अतिक्रमणाचा आरोप; मुंबई महापालिकेने बजावली नोटीस

Subscribe

कथित जमीन अतिक्रमणाच्या तक्रारीवरून भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या दादर युनियन स्पोर्टिंग क्लबला मुंबई महापालिकेने 15 डिसेंबर रोजी नोटीस बजावली आहे. या नोटीसीवर आता दिलीप वेंगसरकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कोणत्याही जमिनीवर अतिक्रमण केलेले नाही आणि क्लब नियमांनुसार चालत असल्याचा दावा वेंगसरकर यांनी केला आहे.

डीयूएससीच्या शेजारील शंभर वर्षे जुन्या दादर पारसी कॉलनीत स्पोर्टिंग क्लबच्या सदस्यांनी पालिकेकडे ही तक्रार केली आहे. दादर पूर्वेकडील पारसी कॉलनी परिसरात हा क्लब आहे. 1923 मध्ये रिकाम्या जमिनीवर भाडेकरार धोरणांतर्गत उभारणी डीपीसीएससीची उभारणी केली गेली. मुंबई महापालिकेने लोकांच्या मनोरंजनासाठी किंवा लोकांना मूलभूत सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने ही जागा भाड्याने दिली होती.

- Advertisement -

मात्र दादर पारसी कॉलनी स्पोर्टिंग क्लबचे सचिव परवेझ यांनी बाना यांनी कमी जागेत नवीन खेळपट्टी तयार केल्याचा आरोप केला आहे. एफ नॉर्थ वॉर्डचे सहाय्यक महापालिका आयुक्त गजानन बेल्लाले यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली आहे. दोन खेळपट्ट्या फारचं वेगळ्या आहेत हे खेळाडूंसाठी धोकादायक आहे. ज्यामध्ये मृत्यूही होऊ शकतो. यामुळे खेळपट्ट्या योग्य अंतरात असाव्यात यासाठी काही नियम तयार करावे अशी विनंती बाना यांनी केली आहे.

29 एप्रिलला हे पत्र वॉर्ड ऑफिसला पाठवण्यात आले असून याबाबत गेल्या दोन आठवड्यांत नोव्हेंबरपर्यंत पालिकेने कोणतीही कारवाई केली नसल्याचेही आरोप बाना यांनी केला आहे. ज्या जमिनीवर नवीन खेळपट्टी तयार करण्यात आली आहे ती जागा डीयूपीसीचा नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.

- Advertisement -

बाना पुढे म्हणाले की, वॉर्ड ऑफिसने कोणतीही कारवाई न केल्याने आम्ही गेल्या महिन्यात महापालिका आयुक्तांपर्यंत हे प्रकरण पोहोचेपर्यंत विविध माध्यमांद्वारे हे प्रकरण जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर स्थानिक वॉर्ड ऑफिसला तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.


ऐतिहासिक चित्रपटांसाठी स्वतंत्र इतिहासकार समिती नेमा, संभाजीराजे छत्रपतींची मागणी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -