बुडत्याला काडीचा आधार, शिंदेसरकारच्या मंत्रिमंडळावर क्लाईड क्रास्टोंचा हल्लाबोल

‘बुडत्याला काडीचा आधार’ तसा ‘शोले’ सिनेमातील दुचाकीवर बसलेले देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे या दोघांचे ‘कॅबिनेट’ आणि त्यांच्या कॅबिनेटमधील निर्णयावर भाष्य करणारे व्यंगचित्र काढत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

कॅबिनेट नाही, आमदारांचा विषय सुप्रीम कोर्टात आहे त्याचा निकाल अजून आला नाही आणि महाराष्ट्र सरकार एवढ्या घाईमध्ये मोठे पॉलिसी निर्णय घेत आहे. त्यांना कोर्टाच्या निर्णयाची भीती आहे का ? असा सवालही क्लाईड क्रास्टो यांनी याअगोदर ट्वीट करुन केला होता.

अडीच वर्ष कटकारस्थान केली आणि महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार पडले, नंतर त्याग देखील केला आणि मुख्यमंत्रीपद सोडले.एवढे सर्व करून सुद्धा मंत्र्यांची कार्यकारिणी अजून जाहीर झाली नाही यामध्ये भाजप का गप्प आहे? सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट बघत आहे का?”क्या इस कहानी मे ट्विस्ट बाकी है?”अशा प्रकारचे ट्वीट करत क्लाईड क्रास्टो यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला होता.

देवेंद्र फडणवीस सांगतात की, संभाजीनगर आणि धाराशीव ही नावे महाविकास आघाडीच्या अल्पमतातील सरकारने घेतली आहे. म्हणून तो निर्णय रद्द करून तोच निर्णय आत्ता आम्ही नव्याने घेणार आहे. खरंतर हा फडणवीस यांचा ‘बालीशपणा’ असून स्वतः श्रेय घेण्याचं कटकारस्थान आहे.’लेकिन ये पब्लिक है, ये ‘सच’ जानती है’असेही ट्वीट क्लाईड क्रास्टो यांनी केले होते.

ट्वीटवरुन शिंदेसरकारवर निशाणा साधतानाच आता क्लाईड क्रास्टो यांनी व्यंगचित्राच्या कुंचल्यातून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना फटकारे लगावले आहेत.


हेही वाचा : कार्यकर्त्यांच्या उत्साहाला लगाम, फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून फलक झळकावण्यास मनाई