घरताज्या घडामोडीआमदार फोडून देशभरातील विरोधी सरकार पाडण्याचं भाजपचं काम, केजरीवालांची टीका

आमदार फोडून देशभरातील विरोधी सरकार पाडण्याचं भाजपचं काम, केजरीवालांची टीका

Subscribe

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषेदतून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आमदार फोडून देशभरातील विरोधी सरकार पाडण्याचं काम भाजप करत असल्याची टीका अरविंद केजरीवाल यांनी केली.

अध्यादेश जारी करत संपूर्ण अधिकार हिसकावून घेतले

- Advertisement -

आम्ही ठाकरे कुटुंबीयांसोबत एक नातं बनवलं आहे. आम्हीही नातं जपणारे आहोत. आपल्या अधिकारांसाठी दिल्लीतील अनेक लोकांनी खूप मोठा संघर्ष केलाय. २०१५ मध्ये दिल्लीत आपचं सरकार आल्यानंतर मोदी सरकारने आमचे सर्व अधिकार हिसकावले. त्याबाबत त्यांनी अध्यादेश देखील काढलं होतं. याप्रकरणी तब्बल ८ वर्षे सुप्रीम कोर्टात दिल्लीतील लोकांनी मोठी संघर्ष केला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने आमच्या पक्षाच्या बाजूने निर्णय घेतला. ज्यादिवशी यासंबंधीत अंतिम निर्णय आला. त्यानंतर ८ दिवसांच्या आत केंद्र सरकारने अध्यादेश जारी करत संपूर्ण अधिकार हिसकावून घेतले. मग लोकशाहीत नागरिकांनी की सरकारने निर्णय घेतले पाहिजेत? असा सवाल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला.

देशभरातील विरोधी सरकार पाडण्याचं भाजपचं काम

- Advertisement -

जनसामान्यांतून महाविकास आघाडीचं सरकार बनलं होतं. परंतु सीबीआय, ईडी आणि काही पैशांच्या माध्यमातून ठाकरेंच्या आमदारांना फोडण्यात आलं आणि हे सरकार पाडलं. त्यामुळे जर कोणत्याही राज्यात भाजपचं सरकार नसेल, तर भाजप त्या-त्या राज्यातील सरकारच्या मंत्र्यांना विकत घेईल, मंत्र्यांना ईडी आणि सीबीआयची भीती दाखवतील किंवा अध्यादेश काढून संपूर्ण अधिकार हिसकावून घेतील. दिल्लीतही तेचं झालं. भाजपनं ऑपरेशन लोटसला सुरूवात केली होती. परंतु त्यांचं हे मिशन असफल ठरलं. केंद्र सरकारला लोकशाही आणि जनतेची काळजी नाही. ते अहंकाराने भरलेले आहेत. २०२४ मध्ये हे सरकार पुन्हा आले तर लोकशाही टिकणार नाही, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

हे लोकशाहीत कसं काय शक्य?

मागील काही महिन्यांपासून मी बघतोय की, भाजपचे मंत्री, नेते सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांबाबत अश्लील शब्द वापरतात. ज्याप्रमाणे भाजप न्यायाधीशांविरोधात सोशल मीडियावर कॅम्पेन चालवतात आणि निवृत्ती झालेल्या न्यायाधीशांना राष्ट्रविरोधी म्हणतात. सुप्रीम कोर्टाने कोणताही निकाल दिला तरी अध्यादेश काढून त्यांचा निकाल पूर्णपणे बदलून टाकण्याचं काम हे भाजप करतं. हे लोकशाहीत कसं काय शक्य आहे, असं केजरीवाल म्हणाले.


हेही वाचा : …तर राज्यात नाही फक्त केंद्रातच निवडणुका होतील; उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -