Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पवारांच्या भेटीला, विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करणार

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पवारांच्या भेटीला, विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करणार

Subscribe

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील वाय.बी.चव्हाण सेंटरवर दाखल झाले आहेत. अरविंद केजरीवालांकडून विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावेळी केजरीवाल यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे शरद पवारांच्या भेटीसाठी वाय.बी.चव्हाण सेंटरवर दाखल झाले असून त्यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत विरोधी पक्षांच्या संदर्भात एकजूट कशी राहावी, याबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

अरविंद केजरीवाल हे काँग्रेसच्या नेत्यांव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट यांसारख्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत. त्यामुळे आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केजरीवाल हे मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत.

- Advertisement -

अरविंद केजरीवाल यांनी काल(बुधवार) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषेदतून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. आमदार फोडून देशभरातील विरोधी सरकार पाडण्याचं काम भाजप करत असल्याची टीका अरविंद केजरीवाल यांनी केली होती.


हेही वाचा : आमदार फोडून देशभरातील विरोधी सरकार पाडण्याचं भाजपचं काम, केजरीवालांची टीका


 

- Advertisment -