घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री चरित्र ग्रंथाचे प्रकाशन तूर्तास लांबणीवर; श्रीसेवकांच्या मृत्यूमुळे निर्णय

मुख्यमंत्री चरित्र ग्रंथाचे प्रकाशन तूर्तास लांबणीवर; श्रीसेवकांच्या मृत्यूमुळे निर्णय

Subscribe

ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित (योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे) या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन समारंभ तूर्तास श्री साधकांचे उष्माघातामुळे निधनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर टाकण्यात आले आहे. प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित या पुस्तकाचे प्रकाशन कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथाली प्रकाशनाद्वारे केले जाणार होते.

रविवारी खारघर येथे निरुपणकार डॉ . अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित केला होता. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते. या समारंभात काही श्री साधकांचे उष्माघातामुळे निधन झाले. त्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा रद्द करण्यात आला आहे.

- Advertisement -

ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित (योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे) या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन समारंभ मंगळवार १८ एप्रिल २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला होता. मात्र हा प्रकाशन समारंभ घेणे सयुक्तिक ठरणार नाही. संवेदनशील आणि सुसंस्कृत महाराष्ट्राची तशी परंपरा नाही. त्यामुळे हा प्रकाशन समारंभ तूर्तास लांबणीवर टाकण्यात आला आहे, असे कार्यक्रमाचे निमंत्रक,उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, नवी मुंबईत महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेल्या ११ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिली. ‘या घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना शासनाकडून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, जे उपचार घेत आहेत, त्यांचा संपूर्ण खर्च शासन करणार आहे’, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

कामोठे येथील एम जी एम रुग्णालयात उपचारासाठी दाखल १७ रुग्णांची मुख्यमंत्री शिंदे यांनी रात्री आठच्या सुमारास भेट घेतली. “महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील ज्या श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. त्यांची मी विचारपूस केली. या रुग्णांना योग्य उपचार देण्याची सूचना डॉक्टरांना केली आहे. ही दुर्देवी घटना आहे. मनाला वेदना देणारी घटना आहे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -