घरमहाराष्ट्रसीएम चषकचा युवा महासंगम मुंबईत!

सीएम चषकचा युवा महासंगम मुंबईत!

Subscribe

मुंबईत ३ फेब्रुवारी रोजी ५० हजार युवक-युवतींच्या सहभागाने युवा महासंगम आयोजित करण्यात येणार आहे.

राज्यातील ४३ लाख युवक-युवतींचा सहभाग असलेल्या सीएम चषक या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेची राज्यस्तरीय अंतिम स्पर्धा मुंबई, पुणे आणि अहमदनगर येथे मंगळवारी सुरू झाली आहे. मुंबईत ३ फेब्रुवारी रोजी ५० हजार युवक-युवतींच्या सहभागाने युवा महासंगम आयोजित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे, खासदार पूनम महाजन, क्रीडामंत्री विनोद तावडे आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा महासंग्राम होणार आहे, अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रवक्ते केशव उपाध्ये भाजयुमो प्रदेश सरचिटणीस आ. संतोष पाटील दानवे आणि विक्रांत पाटील तसेच भाजयुमो मुंबई अध्यक्ष मोहित भारतीय उपस्थित होते.

५० हजार युवक-युवतींचा सहभाग

योगेश टिळेकर म्हणाले की, ‘सीएम चषक या स्पर्धेत १२ विविध प्रकारच्या खेळ आणि कला प्रकारात ४३ लाख स्पर्धकांचे ८ लाख सामने झाले. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पंचवीस ते तीस हजार स्पर्धक सहभागी झाले’. त्यांनी सांगितले की, ‘सीएम चषकच्या राज्य स्तरीय क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामने २९ ते ३१ जानेवारी पर्यंत अहमदनगरमध्ये तर कुस्तीच्या अंतिम स्पर्धा ३१ जानेवारीला पुण्यात होणार आहेत’. मोहित भारतीय म्हणाले की, ‘मुंबईत २ आणि ३ फेब्रुवारीला व्हॉलीबॉल, खो–खो, कबड्डी, कॅरम, ॲथलेटिक्स, रांगोळी, चित्रकला, गीत आणि नृत्य यांच्या अंतिम स्पर्धा होतील. मुंबईत होणाऱ्या समारोप समारंभामध्ये राज्याच्या विविध जिल्ह्यातील ५० हजार युवक-युवती सहभागी होतील’.

- Advertisement -

हेही वाचा – ‘सीएम चषक’ स्पर्धेसाठी भाजपकडून मोर्चेबांधणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -