Homeमहाराष्ट्रCM Devendra Fadnavis : स्वतंत्र विदर्भाबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? सांगितला कन्नमवारांचा...

CM Devendra Fadnavis : स्वतंत्र विदर्भाबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? सांगितला कन्नमवारांचा किस्सा

Subscribe

कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी स्वतंत्र विदर्भाबाबतचे भाष्य केले.

चंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शुक्रवारी (ता. 10 जानेवारी) कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त चंद्रपूरच्या दौऱ्यावर होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त भाजपा आमदार किशोर जोरगेवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांच्याव्यतिरिक्त काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह जिल्ह्यातील इतर नेते सुद्धा उपस्थित होते. मात्र, भाजपा आमदार, पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवर यांनी गैरहजर राहणे पसंत केले. ज्यामुळे मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली. (CM Devendra Fadnavis commented on independent Vidarbha by telling story of Dadasaheb Kannamwar)

कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी स्वतंत्र विदर्भाबाबतचे भाष्य केले. याबाबत ते म्हणाले की, दादासाहेब कन्नमवार यांनी जास्त शिक्षण न घेताही आपले व्यक्तिमत्व तयार केले. महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांचा एक मोठा पगडा कन्नमवार यांच्यावर होता. त्या विचारातून त्यांचे नेतृत्व तयार होत गेले. त्या काळात ते वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी कॉग्रेसचे काम सुरू केले. आपले जे ध्येय आहे ते पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला शांत बसता येणार नाही, अशा प्रकारची ती सर्व मंडळी होती. त्यामुळे त्यांनी एक मोठं संघटन उभे केले.

- Advertisement -

हेही वाचा… Devendra Fadnavis : “चंद्रपूर हा वाघ अन् ‘वारां’चा जिल्हा, आम्ही हेडगेवारांचे अनुयायी, त्यामुळे…”, ‘CM’फडणवीसांची फटकेबाजी

तसेच, जेव्हा संयुक्त महाराष्ट्र तयार झाला तेव्हा संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न होता तेव्हा विदर्भातील 54 आमदारांचे मत होते की आताच वेळ आहे. आपण आताच वेगळ्या विदर्भासाठी मागणी करू. मात्र, तेव्हा दादासाहेब कन्नमवार यांनी भूमिका घेतली की आता ही वेळ नाही. आता आपण महाराष्ट्र एकत्रित केला पाहिजे. आपल्याला महाराष्ट्राला पुढे न्यायचे आहे. मग तेव्हा यशवंतराव चव्हाण यांच्या पाठिमागे आपण उभे राहिले पाहिजे. त्यामुळे दादासाहेब कन्नमवार यांच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण यांना त्या काळात एक मोठे पाठबळ मिळाले, असे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -