Homeमहाराष्ट्रDevendra Fadnavis : महाराष्ट्राचा अपमान करण्याऐवजी आत्मपरीक्षण करा, मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल गांधींना...

Devendra Fadnavis : महाराष्ट्राचा अपमान करण्याऐवजी आत्मपरीक्षण करा, मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल गांधींना सुनावले

Subscribe

राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील वाढीव मतदारांचा मुद्दा देखील उपस्थित केला. त्यांच्या या भाषणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तसेच महाराष्ट्रातील नागरिकांच्या मतांचा अपमान करण्यापेक्षा तुम्ही आत्मपरीक्षण करा, असा टोला देखील फडणवीसांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.

Devendra Fadnavis On Rahul Gandhi : मुंबई : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सोमवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सहभाग घेतला. आपल्या या भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील वाढीव मतदारांचा मुद्दा देखील उपस्थित केला. त्यांच्या या भाषणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तसेच महाराष्ट्रातील नागरिकांच्या मतांचा अपमान करण्यापेक्षा तुम्ही आत्मपरीक्षण करा, असा टोला देखील फडणवीसांनी राहुल गांधी यांना लगावला आहे. (cm devendra fadnavis slams rahul gandhi over clear mandate for mahayuti in assembly elections)

काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधी म्हणाले, संविधानाला मतातून ताकद मिळते. भारतीय नागरिकांच्या मतांशिवाय संविधान काहीच नाही. महाराष्ट्रात नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. जेवढे मतदार पाच वर्षात वाढतात, तेवढे लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत वाढले. पाच महिन्यात मतदारांची संख्या वाढली. शिर्डीमध्ये एकाच इमारतीत 7 हजार नवे मतदार मिळाले. निवडणूक आयोगाला काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार) मतदानाचे आकडे द्यावे लागतील. त्यातूनच कळेल की मतदारांची संख्या कुठे वाढली.

हेही वाचा – S Jaishankar On Gandhi : अशा कार्यक्रमांत पंतप्रधान जात नाहीत, एवढेही माहीत नाही? परराष्ट्र मंत्र्यांनी कोणाला सुनावले –

या विधानसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशची जितकी लोकसंख्या आहे तितक्या नव्या मतदारांची नोंदणी मतदार यादीत केली जाते. लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीच्या काळात 70 लाख नवीन मतदार समाविष्ट करण्यात आल्याचे सांगत राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपासह निवडणूक आयोगाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी 5 वर्षात जितके मतदार जोडले गेले नाहीत तितके शेवटच्या 5 महिन्यात जोडले गेले. मला कोणताही आरोप करायचा नाही, पण काही न काही संशयास्पद जाणवते. नवे मतदार बहुतांश अशा मतदारसंघात वाढलेत जिथे भाजपा साफ झाली होती. हा डेटा आमच्याकडे असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांची पोस्ट काय?

राहुल गांधी यांच्या या दाव्यावर मात्र, देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचा अपमान करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा, असा टोला राहुल गांधी यांना लगावला आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशावर शंका घेऊन तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, वीर सावरकर यांच्या भूमीचा तसेच महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. तसेच तुमच्या पक्षाचा पराभव झाल्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातील जनतेने एनडीएला दिलेल्या लोकशाही जनादेशावर प्रश्नचिन्ह उभे करत असल्याचेही ते म्हणाले. आत्मनिरीक्षण करण्याऐवजी तुम्ही निंदा करत आहात. यासाठी महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा – Parliament Session 2025 : तुम्हाला गोंधळच घालायचा असेल तर मी, लोकसभाध्यक्ष का भडकले वाचा –