नगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात 13 जुलै 2016 रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना 29 नोव्हेंबर 2017 ला फाशीची शिक्ष सुनावण्यात आली होती. यावेळी कुटुंबीयांनी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चिंता व्यक्त केली होती. फडणवीसांनी त्यांना शब्द दिला होता की, तुमच्या मुलीच्या लग्नाला मी नक्की येईल. यानंतर राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेले देवेंद्र फडणवीस यांनी आज पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला हजेरी लावली. (CM Devendra Fadnivas attends the wedding of the victim sister in the Kopardi murder case)
कोपर्डी येथील पीडित सुद्रिक कुटुंबातील मुलीचा विवाह निघोज (ता. पारनेर) येथील वराळ कुटुंबातील मुलाशी झाला. नगर आणि पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील टाकळी हाजी या गावात आज दुपारी साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. संबंधित घटनेपासूच कोपर्डीतील पीडितेच्या वडिलांचा देवेंद्र फडणवीस यांच्याशी कायम संपर्क राहिला आहे. त्यामुळे सुद्रिक यांनी आपल्या धाकट्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण फडणवीस यांना पूर्वीच दिले होते आणि त्यांनाही लग्नाला हजेरी लावणार असल्याचे कबुल केले होते. त्यानुसार, आज देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी लग्नाला हजेरी लावली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, विवाहाचं निमंत्रण होतं, त्यामुळे मी कोपर्डीत आलो आहे. आज दोन कुटुंब एकत्र येत आहेत. सर्वजण वधू-वराला आर्शीवाद देण्यासाठी या विवाह सोहळ्याला आले आहेत. मी देखील वधू-वराला शुभेच्छा देतो, असे फडणवीस यांनी म्हटले.
हेही वाचा – Maha Politics : कार्यकर्त्यांच्या दबावाखाली शरद पवार असं वागतायत; मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास
शब्दांचे पक्के… असे आहेत आमचे नेते
मा. मुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis जी !कोपर्डीत 8 वर्षांपूर्वी एक दुर्दैवी घटना घडली होती. राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून पीडित कुटुंबीयांशी संवाद साधला होता. कुटुंबीयांनी पीडितेच्या बहिणीच्या… pic.twitter.com/3tIOPD7WVR
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) December 8, 2024
दरम्यान, भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी लग्नातील फोटो ट्वीट करत फडणवीसांच्या उपस्थितीबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस हे शब्दांचे पक्के असे आमचे नेते आहेत. कोपर्डीत 8 वर्षांपूर्वी एक दुर्दैवी घटना घडली होती. त्यावेळी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडित कुटुंबीयांशी संवाद साधला होता. कुटुंबीयांनी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाबद्दल चिंता व्यक्त केली होती. तेव्हाच तिच्या लग्नाची जबाबदारी मी घेतो आणि त्या लग्नालाही मी आवर्जून येईन, असा शब्द फडणवीस यांनी दिला होता. आज तो दिवस उगवला आणि देवेंद्र फडणवीस यांनी लग्न सोहळ्याला हजेरी लावत आपला शब्द पाळला. वधू-वराला भरभरून आशिर्वाद दिले. नेता असावा तर असा, दिलेला शब्द पाळणारा! या लग्नात पीडितेच्या कुटुंबीयांनी मंगलाष्टक म्हणण्याची संधी मला दिली, त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभारी आहे. सुजय विखे पाटील, राम शिंदे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली.
हेही वाचा – Nana Patole : आमची 76 लाख मतं चोरली गेली, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून पटोलेंचा आरोप