घरताज्या घडामोडीमुंबईतील विकासकामांना शिंदे-फडणवीस सरकारकडून गती, सुशोभीकरणांतर्गत 320 कामांचं भूमिपूजन

मुंबईतील विकासकामांना शिंदे-फडणवीस सरकारकडून गती, सुशोभीकरणांतर्गत 320 कामांचं भूमिपूजन

Subscribe

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी राज्यभरात विकास कामांचा धडाका लावला आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकासकामांची पायाभरणी आणि भूमीपूजन करण्यात येणार आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकारकडून मुंबईतील सुशोभीकरणाच्या विविध कामांचा भूमीपूजन सोहळा पार पडणार आहे. सुशोभीकरणांतर्गत ३२० कामांचं भूमीपूजन करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या वतीने संपूर्ण मुंबई महानगराचे सुशोभीकरण करण्यासाठी ५०० कामांचा समावेश असलेला विशेष प्रकल्प सध्या प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत अतिरिक्त ३२० कामे हाती घेण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज चेंबूर (पश्चिम), टिळक नगर परिसरातील लोकमान्य टिळक क्रीडांगण येथे होणार आहे. मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण अंतर्गत, ५२ किलोमीटर लांबी असलेल्या १११ रस्त्यांच्या कामांचा प्रत्यक्ष प्रारंभ तसेच, टिळक नगर, नेहरु नगर व सहकार नगरातील मलनि:सारण वाहिन्यांच्या कामांचे भूमिपूजन देखील या निमित्ताने होणार आहे.

- Advertisement -

मुंबई महानगरातील रस्ते कायमस्वरुपी खड्डेमुक्त करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून महापालिकेने रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण काम हाती घेतले आहे. त्यातील, एकूण ५२ किलोमीटर लांब अंतराच्या १११ रस्ते कामांची सुरुवात यानिमित्ताने करण्यात येणार आहे. यामध्ये, पूर्व उपनगरातील ११.०६ किलोमीटर लांबीचे २४ रस्ते, पश्चिम उपनगरातील ३१ किलोमीटर लांबीचे ६१ रस्ते आणि शहर विभागातील ९.६६ किलोमीटर लांबीचे २६ रस्ते समाविष्ट आहेत.

त्याचप्रमाणे, महापालिकेच्या मलनि:सारण प्रकल्प खात्याद्वारे चेंबूर भागातील म्हाडा वसाहतीमधील टिळक नगर, कुर्ला परिसरातील नेहरु नगर व सहकार नगर मधील विद्यमान मलनिःसारण जाळ्याची सुधारणा करण्यासाठी विविध रस्त्यांवर मलनिःसारण वाहिनी पुरविणे व वाहिन्या टाकणे ही कामे केली जाणार आहेत. पैकी टिळक नगरामध्ये १,३९० मीटर लांब, नेहरु नगरामध्ये १,५५० मीटर लांब तर सहकार नगर येथे २०० मीटर लांब अंतराचे मलनि:सारण जाळे उन्नतीकरण करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन देखील यावेळी करण्यात येईल.

- Advertisement -

हेही वाचा : राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांनी शेअर केला ‘हा’ फोटो, विरोधकांची आचारसंहिता भंगच्या कारवाईची मागणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -