घरताज्या घडामोडीMyMahanagar पत्रकार धमकी : मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून कारवाईचे आश्वासन

MyMahanagar पत्रकार धमकी : मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून कारवाईचे आश्वासन

Subscribe

वांद्रे पूर्व काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddique) यांनी माय महानगरचे पत्रकार स्वप्निल जाधव (Journalist Swapnil Jadhav) यांना सोमवारी धमकी दिली होती. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे माय महानगरचे पत्रकार स्वप्निल जाधव यांनी सर्व उपस्थित पत्रकरांसमवेत पत्र देऊन कारवाई करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कारवाई करू असे आश्वासन दिले आहे.

या धमकी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई क्राइम रिपोटर्स असोसिएशनसह (MCRA) मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ तसेच मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाने जाहीर निषेध केला आहे. तसेच शिंदे गटाचे नेते आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी देखील प्रसार माध्यमांशी संवाद साधत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले शंभुराज देसाई?

शंभुराज देसाई यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, माध्यमांच्या कुठल्याही प्रतिनिधीला धक्काबुक्की किंवा दमदाटी झाली असेल. त्याचप्रमाणे दम देण्याचा प्रकार जर घडला असेल तर, तशी संबंधित तक्रार प्रतिनिधींनी पोलिसांना द्यावी. पोलीस सर्व प्रकारच्या बाबी तपासून घेतील. माध्यमांच्या व्यक्तींना दमदाटी करणारा कुणीही व्यक्ती असो, मग ती पदाधिकारी, लोकप्रतिनिधी किंवा कुणीही असो त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करु, असा इशारा शंभुराज देसाई यांनी दिला आहे.

निश्चितपणे कारवाई करू

शेवटी माध्यमांचे प्रतिनिधी हे वृत्त संकलन करण्यासाठी आणि ही माहिती सामान्य जनतेपर्यंत लवकरात लवकर पोहोचावी म्हणून ते काम करत असतात. अनावधानानं घडलं असेल तर आम्ही समजू शकतो, पण जाणीवपूर्वक जर असं काही घडलं असेल आणि संबंधित प्रतिनिधींनी तक्रार केली असेल तर त्यावर चौकशी करून निश्चितपणे कारवाई करू, असं शंभुराज देसाई म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : My Mahanagar च्या प्रतिनिधीला धमकी : विविध पत्रकार संघटनांकडून निषेध, काँग्रेसचे मात्र मौन

आमदार सिद्दिकी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

My Mahanagarचे पत्रकार स्वप्निल जाधव यांना काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी हात तोडण्याच्या दिलेल्या धमकीचा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने तीव्र निषेध केला आहे. आमदार झिशान सिद्दीकी यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी वार्ताहर संघाने केली आहे. या मागणीसाठी संघाच्या वतीने आज, मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कारवाईसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. शिवाय, झिशान सिद्दीकी यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्याची मागणी संघ प्रतिनिधी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन करणार आहेत, असे संघटनेचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि कार्यवाह प्रवीण पुरो यांनी सांगितले.

तसेच टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनने (महाराष्ट्र) देखील या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत आमदार झिशान सिद्दीकी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. आमदार सिद्दीकी यांनी माफी मागवी अन्यथा पत्रकार संघटना आक्रमक भूमिका घेतील, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष विनोद जगदाळे आणि सचिव राजेश माळकर यांनी दिला आहे.

सिद्दीकी यांनी तत्काळ माफी मागावी

लोकप्रतिनिधी असूनही आमदार सिद्दीकी यांचे हे वागणे अशोभनीय असल्याचे सांगत, मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाने पत्रकाराला धमकी देण्याच्या सिद्दीकी यांच्या कृतीचा जाहीर निषेध केला आहे. ‘आमदार झिशान सिद्दीकी यांनी या गोष्टीबद्दल माफो मागावी, अशी मागणी मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या (MIA) वतीने करत आहोत. पत्रकार स्वप्निल जाधव याच्यासोबत आम्ही आहोत,’ अशी स्पष्ट भूमिका एमएआय संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांनी घेतली आहे.


हेही वाचा : MyMahanagar पत्रकार धमकी : जाणीवपूर्वक घडलं असेल तर… शुंभराज देसाईंची प्रतिक्रिया


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -