घरमहाराष्ट्रबंद दाराआड पुन्हा झाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक, दोन तासांत विविध विषयांवर...

बंद दाराआड पुन्हा झाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक, दोन तासांत विविध विषयांवर चर्चा

Subscribe

राज्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये काल (ता. 01 ऑक्टोबर) रात्री उशिरा बैठक पार पडली. या तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तास विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे.

मुंबई : सध्या राज्यातील राजकारणामध्ये विविध घटना घडत आहेत. विशेषतः राज्यातील तीन चाकी सरकारमध्ये तर नेहमीच काही ना काही खलबतं सुरू असतात. राज्यात सध्या एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मिळून राज्याचा कारभार पाहत आहेत. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याने सरकारमध्ये असलेली अस्वस्थता दिसून येत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लवकरच आता आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी करावी लागणार आहे. ज्यामुळे या विषयाशी संबंधित चर्चा करण्यासाठी आणि त्याशिवाय इतरही काही विषयांवर बोलण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये काल (ता. 01 ऑक्टोबर) रात्री उशिरा बैठक पार पडली. या तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तास विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. (CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis, Deputy CM Ajit Pawar discussed various issues in two hours)

हेही वाचा – मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला मुख्यमंत्री, भाजपा जबाबदार, यासाठीच…; संजय राऊतांचा गंभीर आरोप

- Advertisement -

काल रात्री जवळपास दोन तास झालेल्या बैठकीमध्ये आमदार अपात्र प्रकरणात उद्भवणाऱ्या कायदेशीर पेचप्रसंगातून कसा मार्ग काढायचा, लॉ फर्मची कशाप्रकारे मदत घ्यायची, याशिवाय राज्यातील मराठा तसेच ओबीसी आरक्षणाबाबत देखील चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केंद्रातील नेतृत्वाकडे शब्द टाकण्यातबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आमदार अपात्रतेच्या प्रकरणात कधी सुनावणी घ्यायची? याबाबतचे वेळापत्रक विधानसभा अध्यक्षांकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र आता या प्रकरणात एखादा कायदेशीर पेचप्रसंग निर्माण झाल्यास त्याला राज्याच्या पातळीवर कसे तोंड द्यायचे, यासंदर्भात नेमण्यात आलेल्या लॉ फर्मचा आणि राज्यातील विधी विभागाची सांगड घालून कशाप्रकारे पुढची व्यूवहरचना तयार करायची या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

महत्त्वाची बाब म्हणजे राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची रविवारी बैठक होत असून त्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर देखील या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -