घरट्रेंडिंगएकनाथ शिंदे व आदित्य ठाकरे येणार आमने-सामने; एकाच ठिकाणी होणार सामना

एकनाथ शिंदे व आदित्य ठाकरे येणार आमने-सामने; एकाच ठिकाणी होणार सामना

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फुट पडली आहे. राज्यात राजकीय वातावरण पटले असून, शिंदे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार एकमेकांवर टीका करत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फुट पडली आहे. राज्यात राजकीय वातावरण पटले असून, शिंदे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार एकमेकांवर टीका करत आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे राज्यभरात शिव संवाद यात्रा करत आहेत. या यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करत आहेत. अशातच उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आमने-सामने येणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. एकनाथ शिंदे सकाळी ७ वाजता पुण्यातल्या कात्रज चौकामध्ये आमदार तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. त्याचवेळी आदित्य ठाकरे हे कात्रजमध्ये शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत.

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांनी आतापर्यंत मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, कोकण या ठिकाणी झालेल्या सभेमध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

दरम्यान, एकनाथ शिंदे माजी आमदार विजय शिवतारे यांच्या मतदारसंघात ही सभा होणार आहेत. या सभेत एकनाथ शिंदे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दौरा

  • मंगळवारी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे पाऊस, अतिवृष्टी, पीक-पाणी व विकास कामे याबाबत आढावा बैठक.
  • दुपारी १:२० वाजता फुरसुंगी येथील पाणी योजना प्रकल्पाला भेट व पाहणी करणार आहे.
  • दुपारी २:२० वाजता खंडोबा जेजुरी देवस्थान येथे भेट व राखीव.
  • दुपारी २:४५ वाजता सासवड येथे शिवसेना पक्षाची जाहीर सभा.
  • संध्याकाळी ४:०० वाजता माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या निवस्थानी राखीव.
  • संध्याकाळी ५:४५ वाजता हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, फुटबॉल मैदान उद्घाटन.
  • संध्याकाळी ७ वाजता आमदार तानाजी सावंत यांच्या निवासस्थान येथे भेट व राखीव.
  • सध्याकाळी ८:४० वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बैठक तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभागृहात आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रबाबत बैठक.

हेही वाचा – माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा करा; अखेर राज्यपालांचा माफीनामा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -