घरताज्या घडामोडीबाळासाहेबांच्या योजना पुढे नेऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

बाळासाहेबांच्या योजना पुढे नेऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

Subscribe

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री झाल्याबद्दल शिंदेंनी त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. तसेच त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. मात्र, जोशींच्या मार्गदर्शनानंतर बाळासाहेबांच्या योजना पुढे नेऊ, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेतील ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी मी येथे आलो आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ज्यांनी बाळासाहेबांसोबत काम केलं. शिवसेना वाढवण्याचं काम केलं. त्या काळात बाळासाहेबांबरोबर जे प्रमुख नेते होते. त्यामध्ये मनोहर जोशी सर प्रमुख होते. अशा जेष्ठ नेत्यांचे आशीर्वाद, शुभेच्छा आणि त्यांचे मार्गदर्शन नेहमीच कामी येणार आहे.

- Advertisement -

बाळासाहेबांच्या योजना पुढे नेऊ

जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी ६० योजनांची घोषणा केली होती. एक पुस्तक देखील त्यांनी मला भेटं दिलं. युती सरकारच्या काळात त्यांनी त्या योजनांची घोषणा केली होती. या योजना तुम्ही प्रभावीपणे राबवा, असं त्यांनी सांगितलं. बाळासाहेबांना अपेक्षित असलेल्या योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. अशा प्रकारची भावना देखील त्यांनी व्यक्त केली. आमचं युतीचं सरकार त्या योजना नक्कीच पूर्ण करेल, अशी ग्वाही एकनाथ शिंदेंनी दिली.

विविध घटकांना न्याय देण्याचं काम आमचं सरकार नक्की करेल

आम्हाला या राज्याचं सर्वांगिण विकास करायचं आहे. अनेक चांगल्या योजना लोकापर्यंत पोहोचवायच्या आहेत. सरकार आणि शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, अशा प्रकारचं काम आम्हाला करायचं आहे. या राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि विविध घटकांना न्याय देण्याचं काम आमचं सरकार नक्की करेल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

युती सरकारमध्ये ज्या ६० योजना आम्ही घोषित केल्या होत्या. त्या चांगल्या योजना असून त्या आम्ही राबवणार आहोत. तसेच आणखीन त्याच्यामध्ये काही भर घालता आलं तर नक्की घालू, असं शिंदे म्हणाले.


हेही वाचा : ‘त्यांच्या’वर बोलणं म्हणजे तोंडाची वाफ दवडण्यासारखं, देवेंद्र फडणवीसांचा राऊतांना टोला


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -