घरताज्या घडामोडीराज्याच्या विकासासाठी सहकार्य करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अमेरिकेला आवाहन

राज्याच्या विकासासाठी सहकार्य करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अमेरिकेला आवाहन

Subscribe

राज्यातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसोबतच दुर्गम आणि दुष्काळग्रस्त भागात कृषी, आरोग्य, शिक्षणाला शासनाने प्राधान्य दिले आहे. या क्षेत्रांसाठी आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य अमेरिकेने करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

राज्यातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसोबतच दुर्गम आणि दुष्काळग्रस्त भागात कृषी, आरोग्य, शिक्षणाला शासनाने प्राधान्य दिले आहे. या क्षेत्रांसाठी आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य अमेरिकेने करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मुंबईतील अमेरिकेचे वाणिज्यदूत माईक हँकी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी हे आवाहन केले. (CM Eknath Shinde Appeal Development Of State Agriculture Health Education Drought Affected)

वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीत महाराष्ट्रात कृषी, सायबर सुरक्षा, सौरऊर्जा, उत्पादन आधारित उद्योग गुंतवणूक, जागतिक दर्जाचे शिक्षण क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत चर्चा झाली. या चर्चेवेळी राज्य शासनाने कृषी, शिक्षण, आरोग्य, माहिती व तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

- Advertisement -

याशिवाय, राज्यातील विकास प्रकल्पांना आशियाई विकास बँकेचे (एशियन डेव्हलपमेंट बँक) मोठे सहकार्य लाभत आहे. तसेच सहकार्य करत राज्यातील प्रस्तावित विकास प्रकल्पांना निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकेच्या संचालक मंडळाला केले. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या (एडीबी) कार्यकारी संचालक मंडळाच्या शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केले.

या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “देशाच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सुमारे 50 टक्के आहे. राज्य शासनामार्फत सामाजिक आणि आर्थिक विकासाचे विविध प्रकल्प राबविण्यात येत असून ग्रामीण भागात विकासाचे आणखी प्रकल्प राबविण्याची आवश्यकता आहे. वातावरणीय बदल आणि अनिश्चित पाऊस यामुळे कृषी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर बाधित होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानावर परिणाम होत आहे. कृषी क्षेत्रात शाश्वतता आणण्यासाठी ज्या भागात अधिक पाऊस पडतो त्या भागातील पाणी, नदीजोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे कमी पावसाच्या भागात वळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे कृषी क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल.”

- Advertisement -

“प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कॉप 26 परिषदेत केलेल्या आवाहनानुसार राज्य शासन प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून परिवहन विभागांतर्गत पारंपरिक इंधनावर चालत असलेल्या बसेस ग्रीन आणि स्वच्छ इंधनावर परिवर्तित केल्या जाणार आहेत. एडीबीच्या सहकार्याने शासनाचे मेट्रो प्रकल्प देखील सुरू आहेत. या दोन्ही प्रकल्पांमध्ये यापुढे देखील एडीबीचे सहकार्य अपेक्षित आहे”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा – आर्थिक सुधारणांबद्दल देश माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा ऋणी; नितीन गडकरींकडून कौतुक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -