मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने कसा आपल्या शेतावर जातो म्हणून मला हिणवण्यात आलं. हेलिकॉप्टरने शेतात जाणारा दुसरा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख मिळवा असं बक्षीस लावलं, असा टोमणाही मारला. आता मी म्हणतो, अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा, बक्षीस मिळवा, अशा शब्दात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ठाकरे सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत.
आम्ही देना बँक आहे लेना बँक नाही
लोकांचं बक्षीस वाचावं म्हणून आम्ही मुख्यमंत्रीचं बदलला, सरकारचं बदलून टाकलं आणि लोकांना मोठं बक्षीस देऊन टाकलं ते काल विदर्भाला मिळालं, दादांना माहित आहे आम्ही देणारे आहोत घेणारे नाहीत. देना बँक आहे लेना बँक नाही. तुम्हीपण तसेच आहात घेणारे नाहीत देणारे आहेत, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आमच्या सरकारला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. तो विकास गेल्या सहा महिन्यात पोहतोय, अनेक निर्णय घेतले, समृद्धी महामार्गाचा लोकर्पण केला. या महामार्गातून राज्याची भरभराट होईल, समृद्धी महामार्ग एक गेमचेंजर ठरेल. विदर्भाला याचा फायदा होतोय, हे अधिवेशन विदर्भात होतेय. मात्र विदर्भात अधिवेशवेशन एक महिना पाहिजे होत असं विरोधकांची मागणी होता. अशा परिस्थितीत विदर्भाला न्याय देण्याचे निर्णय घेतले, खऱ्या अर्थाने भरभराटीचा जो प्रारंभ केला, विदर्भ मजबूत तर राज्य मजबूत कालचं म्हणालो. भविष्यात त्याचे परिणाम पाहायला मिळतील,
मुख्यमंत्री शिंदेंनी अजितदादांची घेतली फिरकी
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, दादा तुम्ही माझं भाषण बरोबर लक्ष देऊन ऐकत होता. पण मनात असूनही मोकळेपणाने दाद दिली नाही हे मला जाणवलं. तुमच्यावर महाविकास आघाडीचा दबाव अस समजू शकतो, मी नेहमी म्हणतो अजित दादा स्पष्टवक्ते आहेत चांगल्याला चांगलं म्हणतात, परंतु काल विदर्भासाठी एवढे निर्णय घेतले त्यावरून अपेक्षा होती की, घेतलेल्या निर्णयाचे समर्थन किंवा चांगल म्हणावं. परंतु आपण माझ्या भाषणाला मिळालेल्या टाळ्या मोजत राहिलात. आणि मला म्हणालात अमक्याने टाळ्या वाजल्या तमक्याने टाळ्या वाजल्या नाही, टाळ्या मोजण्यापेक्षा काल घेतलेल्या विकासाची कामं निर्णय मोजले असते तर बरं वाटलं असतं. दादा तुमचा चेहरा पाहत होतो तुम्हाला वाटलं असंल असे काही निर्णय विदर्भासाठी होणार नाहीत. त्यामुळे सरकारचा परफॉर्म्स पाहिला ते आपल्याला अपेक्षित नव्हतं. जे निर्णय आहेत ते ट्विस्ट करण्याचा प्रयत्न केलात. म्हणजे चर्चा वेगळ्या यासाठी प्रयत्न केला पण ते आपल्याकडून अपेक्षित नव्हतं असही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हे विदर्भात कुठे अधिवेशन घेत होते. चायनामध्ये, जपानमध्ये कोव्हिड आला, पण सरकार बदललं नसतं तर विदर्भात अधिवेशन झालं नसतं म्हणत गेल्या अडीच वर्षांत विदर्भासाठी कोणता निर्णय घेतलात असा प्रश्नही त्यांनी विरोधकांना विचारला.
सत्ताधारी आणि विरोधी पक्ष राज्याचा कारभार घेत असतो, राज्याचे निर्णय घेत असतो. विरोधी पक्षाचं सहकार्य अपेक्षित असतं. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी ही दोन चाकं आहेत. गेल्या सहा महिन्यापूर्वी आलेल्या सरकारचा कामाचा वेग राज्याने पाहिला आहे. कमी कालावधीत घेतलेले निर्णय पाहून हे लोकांना काही तरी देणारं सरकार आहे अशी भावना मनात येते असही मुख्यमंत्री म्हणाले.
सरकारने आल्या आल्या पेट्रोल डिझेलच्या किमती कमी केल्या, शेतकऱ्यांसाठी चौकटीच्या बाहेर जाऊन मदत जाहीर केली, एनडीआरएफच्या नॉर्म्सच्या बाहेर जाऊन दुप्पट मदत केली, दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले. सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी ७५५ कोटी रुपये दिले. यामध्ये आणखी काही नुकसान होणार होत त्यांनी पैसे देण्याचा निर्णय घेतला त्याचं वाटप सुरु झालं आहे. ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा मोफत प्रवास दिला. २ कोटी लोकांनी एसटीचा मोफत प्रवास केला. आरोग्य तपासणीसाठी ते तालुक्यात येऊ लागले. चेकअप करु लागले, तीर्थक्षेत्रात जाऊ लागले, त्याच्या आयुष्यात अमुलाग्र बदल जाणवू लागले आहेत, असही मुख्यमंत्री म्हणाले.
दिव्यांगांसाठी महाराष्ट्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणार
दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, दिवाळासाठी १०० रुपयांत चार वस्तू दिल्या. ७ कोटी लोकांना त्याचा फायदा झाला. त्यामध्ये काही गोष्टी मागेपुढे झाल्या. आम्ही जसा गोविंदा सुरु केला, गणपती मोठा केला, निर्बंध हटवले नवरात्र मोठी केली, लोकं बाहेर आली, रस्त्यावर आली आनंद चेहऱ्यावर दिसू लागला. दिवाळीपण मोठी झाली पाहिजे असं आम्ही बोलून थांबलो नाही. कोरडं आश्वासन आम्ही दिलं नाही. आम्ही दिवाळी साजरी करण्यासाठी जे पदार्थ लागतात त्याचं सामान शंभर रुपयात दिले.
राज्यभरात ७०० बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना होणार सुरु
काल धानासाठी हेक्टर १५ हजारांचा बोनस जाहीर केला, आधी हा बोनस क्विंटलवर देत होते. त्यामध्ये गैरप्रकार होत होते. आता थेट शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे जाणार मध्ये कोणालाही पैसे खायला मिळणार नाही. अतिवृष्टी ग्रस्तांना ५ हजार कोटीं मदत जाहीर केली, शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार उभं राहिलं, राज्यभरात ७०० बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करत आहे. मुंबईत ५० ५२ दावाखाने सुरु केले. याची सुरुवात ठाण्याला केली, त्यानंतर मुंबई महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करणार आहोत. यातून लोकांना मोफत ट्रटमेंट, औषधं, ४४ प्रकारच्या मोफत तपासण्या आणि त्यापुढील उपचार देखील मोठ्या हॉस्पीटलमध्ये केले जाणार आहे, असही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
जलयुक्तशिवार योजना आम्ही पुन्हा सुरु केली, ती मागील सरकारच्या काळात बंद होती, काय फायदा झाला बंद करून, शेतकऱ्यांना फायदा होईल, ७५ हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्णय सरकारने घेतला. अजित दादा इच्छा असतानाही दादा घाबरत होते कोर्टात काय होणार? कोर्टात काय होणार ते होऊ दे.. आपल्या गोरगरीब लोकांना नोकऱ्य़ा मिळाल्या पाहिजे. म्हणून अधिसंख्य पदं जवळपास दीड दोन हजार लोकांना त्यातून नोकऱ्या मिळणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
विदर्भासाठी तुम्ही अडीच वर्षे कोणात निर्णय घेतला? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
विदर्भासाठी तुम्ही अडीच वर्षे कोणात निर्णय घेतला? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना विचारला. ते पुढे म्हणाले की, वैधानिक विकास मंडळही बंद झालं. शेतकऱ्यांनी बोनसची मागणी केली नाही तरी धानला बोनस दिला हे आमचं सरकार आहे. काही मागण्याची आवश्यता नाही आम्हाला माहित असतं शेतकऱ्यांना काय पाहिजे. ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आमचं स्वप्न आहे की पश्चिम महाराष्ट्रातील इतर ठिकाणंचा शेतकरी चांगल्या गाडीत फिरतो, तसा विदर्भातील शेतकरी देखील चांगल्या गाडीत फिरला पाहिजे. आता समृद्धीमुळे फिरायला लागला आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा हेलिकॉप्टरने फिरलं पाहिजे, का नको? त्यासाठी तालुका तालुका लेव्हला हेलिपॉड बनत आहोत. यामुळे एअर अॅब्युलन्सने औषधोपचारांसाठी एअरलिफ्ट करता येईल.
नववर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
आज आपल्या सरकारला सहा महिने पूर्ण होत आहेत. ३० जूनला शपथविधी झाला, पर्वापासून इंग्रजीचं नवीन वर्ष सुरु होत आहे. त्यासाठी सभागृहातील सदस्यांना आणि राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं आनंदाचं आणि निरोगी जावं, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.