घरताज्या घडामोडीबंजारा बोर्डासाठी ५० कोटींचा निधी मंजूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

बंजारा बोर्डासाठी ५० कोटींचा निधी मंजूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Subscribe

वाशिम – बंजारा समाजाच्या विकासासाठी शासन सदैव सकारात्मक आहे. कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता शासन घेईल. बंजारा समाजाच्या विकासासाठी वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था तसेच नंगारा बोर्ड स्थापन करून त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पोहरादेवी येथे केली. बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या पंचधातूच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण, सेवाध्वजाचे आरोहण व ५९३ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, पोहरादेवी येथे आल्यावर काशीला आल्यासारखे वाटले. बंजारा समाज हा निसर्गपूजक आणि लढवय्या आहे. समाजातील कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता शासन घेईल. नवी मुंबई येथे बंजारा समाज भवन स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

- Advertisement -

तांडा सुधार योजनेत प्रत्येक तांड्यावर पाणी, रस्ते इत्यादी मूलभूत सुविधा विकासासह शाळा, दवाखाने, अंगणवाडी यासारख्या सुविधाही उपलब्ध करून देऊ, असे आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

पोहरादेवीचा कायापालट करू – उपमुख्यमंत्री फडणवीस

- Advertisement -

बंजारा समाजाची काशी असलेल्या या स्थळाचा कायापालट करण्यासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही. ज्याप्रमाणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काशीचा कायापालट केला. त्याप्रमाणे बंजारा समाजाच्या काशीचा अर्थात पोहरादेवी तीर्थस्थळाचा कायापालट करू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -