Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रCM Eknath Shinde : जनता 2019 ची घटना विसरली नाही; मतदानानंतर मुख्यमंत्र्यांचा...

CM Eknath Shinde : जनता 2019 ची घटना विसरली नाही; मतदानानंतर मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

Subscribe

आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला आहे. तसेच यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांना चांगलाच टोला लगावला आहे.

मुंबई : आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला आहे. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले, आजचा दिवस लोकशाहीचा उत्सव करण्याचा आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी या उत्सवात सहभागी व्हायचे आहे. राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करा आणि मतदानाचा टक्का वाढवा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. तसेच 2019 ची घटना जनता विसरली नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. (CM Eknath Shinde On Mahavikas Aaghadi.)

हेही वाचा : Maharashtra Assembly 2024 : महानगरपालिका आयुक्तांचे नागरिकांना आवाहन; म्हणाले…

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी आज सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला आहे. यावेळी त्यांच्या पत्नी, सून आणि मुलगा खासदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित होते. तसेच राज्यातील मतदानाचा टक्का वाढायला हवा यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचे करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी जनतेला केले आहे. तसेच 2019 च्या वर्षात जे काही झाले ते जनता कधीही विसरणार नाही आहे. 2019 मध्ये जनतेच्या मनात महायुती होती मात्र ते सरकार आले नाही, असे ते म्हणाले आहेत. तसेच 2019 मध्ये जनतेच्या अपेक्षेविरुद्ध सरकार स्थापन झाल्याचे ते म्हणाले आहेत. त्यामुळे जनता नाराज आहे.

हेही वाचा : Maharashtra Election 2024 : मुंबईत सकाळी 11 वाजेपर्यंत किती टक्के मतदान? वाचा सविस्तर…

- Advertisement -

तसेच आमच्या सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनामुळे राज्यातील अनेक आमच्या बहिणींना हातभार लागला आहे. तसेच येत्या 23 नोव्हेंबरला राज्यात महायूतीचे आणि बहुमताचे सरकार असले असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. कारण राज्यातील जनतेने आमच्या सरकारचा अडीच वर्षातील विकास पाहीला आहे. आम्ही विकासाला प्राधान्य देत आहोत, हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे राज्यात आमचेच सरकार येईल यात कोणतीच शंका नसल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच महाविकास आघाडीने थांबवलेला विकास आम्ही पुन्हा सुरू केल्याचे देखील त्यांनी यावेळी नमूद केले आहे. (CM Eknath Shinde On Mahavikas Aaghadi.)


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -