मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त कुलाब्यातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले आहे. तसेच यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहोत. बाळासाहेबांच्या मनातील राज्य घडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच यावेळी त्यांनी महायुती सरकार पुढचे पाच वर्ष पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. (CM Eknath Shinde On Mahavikas Aaghadi.)
हेही वाचा : Amit Shah : अमित शहा तातडीने दिल्लीला रवाना, विदर्भातील सभा रद्द; काय आहे कारण
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या कुलाब्यातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले आहे.त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, दोन ते अडीच वर्षात जे प्रकल्प बंद झालेले ते आम्ही आमचे सरकार स्थापन झाल्यावर पुन्हा सुरू केले आहेत. तसेच या सध्याच्या राज्य सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्या. त्याचा फायदा या राज्यातील नागरिकांना झाला आहे. तसेच महायुती सरकार पुढचे पाच वर्ष सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच पुन्हा सत्तेत आल्यावर आम्ही जोमाने कामाला लागू आणि राज्याचा जास्तीत जास्त विकास करण्यात भर देऊ, असेही ते म्हणाले आहेत.
हेही वाचा : RokhThok : अमित शहांचे नाटक महाराष्ट्राने पाहिले, संजय राऊतांचा घणाघात
तसेच यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, विरोधकांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नव्हता. विकासाला स्थगिती देण्याचे काम त्या सरकारने केले होते. ते सत्तेत राहिले असते तर महाराष्ट्र दहा वर्षे मागे गेला असता. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर आणि महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
Edited By Komal Pawar Govalkar