Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रCM Eknath Shinde : आमच्या लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना जोडा दाखवला, शिंदेंचा...

CM Eknath Shinde : आमच्या लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना जोडा दाखवला, शिंदेंचा टोला

Subscribe

आमच्या लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना जोडा दाखवल्याचा टोला लगावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या दैदिप्यमान विजयावर आपले मत व्यक्त केले आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती राज्यातील आपली सत्ता राखण्यात मोठे यश आले आहे. महायुतीने राज्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला असून मविआला तीन आकडी संख्या सुद्धा गाठता आलेली नाही. विधानसभा निवडणुकीच्या या निकालांमुळे मविआला मोठा धक्का बसलेला असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. आमच्या लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना जोडा दाखवल्याचा टोला शिंदेंनी लगावला आहे. आम्ही लोकांची मनं जिंकली, त्यामुळे हा निकाल लागला असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले. राज्यात महायुतीला क्लीन स्विप मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपले मत व्यक्त मविआवर टीकास्त्र डागले आहे. (CM Eknath Shinde criticizes Mahavikas Aghadi saying that our dear sisters have shown shoes to step brothers)

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आजचा दिवस ऐतिहासिक आहे आणि हा विजय देखील ऐतिहासिक आहे. ही निवडणूक लोकांनी त्यांच्या हातात घेतली होती. जनतेने मतांचा वर्षाव केला. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी या सर्वांनी महायुतीवर प्रेम दाखवले, या ऐतिहासिक विजयासाठी मी त्यांना दंडवत घातला पाहिजे. गेल्या दोन वर्षात आम्ही जे काम केले, जे निर्णय घेतले, ते अभूतपूर्व होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक विकासकामे थांबली होती. पण आम्ही ते सुरू केली, आम्ही कामाला, विकासाला प्राधान्य दिले. या राज्याचा सर्वांगिण विकास आमच्या डोळ्यासोर होता, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा… Mahayuti : आमची टिंगलटवाळी केली पण…; विजयानंतर काय म्हणाले अजित पवार?

तसेच, अडिच वर्षात जी कामे थांबली होती. ती वेगाने सुरू केली. त्याचबरोबर कल्याणकारी योजना राबवल्या, लाडकी बहीण, युवा प्रशिक्षण योजना, सिलेंडर मोफत दिले, शेतकऱ्यांना 15 हजार कोटींचा मोबदला दिला. विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. या राज्याला पुढे न्यायचं सर्वांगिण विकास करायाचा हे आमचे ध्येय होते. केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या पाठिशी उभे राहिले, गेल्या दोन वर्षात लाखो कोटींचा निधी दिला.आमच्यावर अनेक आरोप झाले. त्यां आरोपाना आम्ही सामोरे गेलो. आमची नियत साफ होती.आचारसंहिता लागण्यापूर्वीच आम्ही नोव्हेंबरचे लाडक्या बहिणीचे पैसे ऑक्टोबरमध्येच दिले होते. लोकांनी द्वेषाचे, आरोपांचे राजकारण धुडकावलं. एवढं करूनही नरेंद्र मोदी पंतप्रधनपदी बसले, आम्ही आरोपांना आरोपातून उत्तर नाही दिलं. कामातून उत्तर दिलं. सरकार पडणार म्हणायचे पण आम्ही काम करत राहिलो, असे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -