Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र "शासन आपल्या दारी" कार्यक्रमात कोणाला जबरदस्ती आणलेलं नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा मविआला टोला

“शासन आपल्या दारी” कार्यक्रमात कोणाला जबरदस्ती आणलेलं नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा मविआला टोला

Subscribe

औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात "शासन आपल्या दारी" कार्यक्रमाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक लोकांनी उपस्थिती दर्शवली.

औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात “शासन आपल्या दारी” कार्यक्रमाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक लोकांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी गर्दीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला. आजच्या कार्यक्रमाला कोणाला जोर जबरदस्तीने आणलेलं नाही. या एका प्रेमापोटी आलेल्या माता भगिनी आहेत. माझ्या भाषणाला आलेली लोकं नंतर निघून गेली, असे सांगण्यात येते. त्यामुळे हे चित्र पाहा आणि हे प्रेम बघा. सकाळपासून हे लोकं आलेले आहेत. हे सर्व काही पत्रकारांनी दाखवा, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. आजची गर्दी महाराष्ट्राला दाखवा, असेही मुख्यमंत्र्यांकडून यावेळी सांगण्यात आले.

हेही वाचा – नसबंदी झाल्यावर मुलं होत नाहीत, पण संजय राऊत असा एक चमत्कार…; शिवसेनेची टीका

- Advertisement -

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या सभेला आलेला एकही व्यक्ती सकाळपासून कुठेही गेलेला नाही. त्यामुळे प्रसार माध्यमांनी ही खरी गोष्ट दाखवावी. पण कोणीतरी काहीतरी सांगतो म्हणून ते दाखवून आमच्या बद्दल चुकीचे मत तयार होते. त्यामुळे माझी विनंती आहे की जे खरं आहे ते खरं आहे. जर आमच्याकडून काही चूक झाली तर चुकीचं दाखवा. पण आजची ही सत्य परिस्थिती महाराष्ट्राला दाखवून द्या, असेही मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले.

तर,  आजपर्यंत लोकांना शासनाच्या दारी जावे लागत होते. पण सरकारडे भलीमोठी यंत्रणा असताना का आपण लोकांपर्यंत जावू शकत नाही. त्यामुळे या यंत्रणेचा वापर सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे. का लोकांना त्यांच्या कामांसाठी मुंबईला, तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर बोलवायचं? त्यामुळे यातूनच शासन आपल्या दारी ही संकल्पना तयार झाली, असे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

याआधी देखील महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनेक भाषणे झाली. पण या भाषणांच्या दरम्यान अनेकदा लोकांनी काढता पाय घेतल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली. तर मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमाला बोलावण्यात येणाऱ्या लोकांना पैसे देण्यात येते, असे देखील विरोधकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला आलेल्या जनतेला लोकांना प्रसार माध्यमांनी दाखवण्याची वारंवार विनंती मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली.

- Advertisment -