घरमहाराष्ट्र"आम्ही घरात बसून नाही तर फिल्डवर काम करणारे लोकं.."; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव...

“आम्ही घरात बसून नाही तर फिल्डवर काम करणारे लोकं..”; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तर आम्ही घरात बसून काम करणारे नाही तर फिल्डवर उतरून काम करणारे लोकं आहोत, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पणानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित केले. याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तर आम्ही घरात बसून काम करणारे नाही तर फिल्डवर उतरून काम करणारे लोकं आहोत, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे. (CM Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray)

हेही वाचा – Samruddhi Highway : हा महामार्ग न होण्यासाठी अनेकांनी आम्हाला विरोध केला; फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

- Advertisement -

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या समृद्धी महामार्गाची संकल्पना देवेंद्र फडणवीस यांची होती. जी आज पूर्णत्वास आली आहे. साईंच्या पदस्पर्शाने पावन भूमीवर हा लोकार्पण सोहळा पार पडत आहे. सर्वांसाठी महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आता दुसऱ्या टप्प्यातील 80 किमीचे लोकार्पण करण्यात येत आहे. ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने आपल्या सरकारचा मार्ग मोकळा केला, त्याप्रमाणे समृद्धीचा मार्ग आपण मोकळा केला. तर येत्या डिसेंबर महिन्यात 100 किमीचा रस्ता पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली. तर डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण समृद्धी महामार्ग खुला करण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

तर, दिलेला शब्द आम्ही पाळतो. दिलेला शब्द पाळायची आम्हाला सवय आहे. एकदा कमिटमेंट केली म्हणजे केली. मग त्या शब्दाला जागणं हे आमचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य आम्ही पार पाडत असतो. आम्ही जे करतो ते जाहीरपणे करतो. जाहीरपणे शब्द देतो. काही लोकांप्रमाणे आम्ही घरात बसून चर्चा करत नाही. तर बंद खोलीत बसल्याने काहीही बोलायला मोकळे असतात. त्यामुळे आपण खुले किताब आहोत आणि त्याचमुळे असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण होऊ शकतात, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली.

- Advertisement -

पुढे बोलताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी माझ्याकडे काही कामच नव्हतं. तेव्हा फडणवीसांनी सांगितलं, असं काम देतो दुसरं काम करण्याची गरजच पडणार नाही. तेव्हा त्यांनी माझ्याकडे समृद्धी महामार्गाचं काम दिलं अन् मीही रस्त्यावर उतरुन काम केलं. अनेक अडथळे आले, विरोध केला गेला परंतु आम्ही अडचणीतून मार्ग काढून पुढे जात राहिलो. शेतकऱ्यांना तीन तासांमध्ये आम्ही पैसे देण्याचं काम केलं, त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास वाढत गेला, अशी माहिती शिंदेंनी यावेळी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -