घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदेंची उपमुख्यमंत्र्यांसह 'वर्षा'वर बैठक; प्रभादेवीतील राडा, पोलीस बदल्यांवर झाली चर्चा

मुख्यमंत्री शिंदेंची उपमुख्यमंत्र्यांसह ‘वर्षा’वर बैठक; प्रभादेवीतील राडा, पोलीस बदल्यांवर झाली चर्चा

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काल रात्री उशीरा वर्षा या शासकीय निवासस्थानी पावणे दोन तास बैठक झाली. या बैठकीत मुंबईतील प्रभादेवी राड्यानंतरच्या कायदा सुव्यवस्थेबाबतची परिस्थिती तसेच राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या बदल्या या दोन मुद्यांवर विस्तृत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईतील प्रभादेवी परिसरात शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं, यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा बंगल्यावर काल बैठक झाल. दरम्यान शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांच्यावर पोलिसांकडून आर्म अॅक्टनुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. याशिवाय राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहेत. यात गृहविभागातील पोलीस अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या बदल्यांवरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याची माहिती आहे.

- Advertisement -

अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रभादेवी परिसरात शिवसेनेकडून गणेश भक्तांच्या स्वागतासाठी मंच उभारण्यात आले होते. यात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट अशा दोन्ही गटाकडून प्रभादेवी परिसरात मंच उभारले होते.शिंदे गटाकडून आमदार सदा सरवणकर आणि शिवसेनेकडून माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांचे दोन वेगळे मंच उभारले होते. मात्र शिंदे गटाच्या मंचावरून काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांविषयी काही अपशब्द वापरले. ज्यावरून शिंदे गट आमि शिवसेना यांच्यात तुफान राडा झाला. या वादाचे रुपांतर मध्यरात्रीतील राड्यात झाले. त्यानंतर शनिवारी शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. दा सरवणकर समर्थकांकडून शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यानंतर शाब्दिक बाचाबाचीही झाली. दरम्यान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह काही शिवसैनिकांना पिस्तूलचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. ज्यानंतर सदा सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट! राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान अजित पवार मंचावरून गेले निघून

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -