घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा एक फोन अन् तत्काळ 7 कोटी मंजूर; वाचा नेमके...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा एक फोन अन् तत्काळ 7 कोटी मंजूर; वाचा नेमके काय घडलं?

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या फोननंतर कार्यक्रमातील उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. तसेच, सभागृहात एकच जल्लोष झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज नंदुरबार नगर परिषद नूतन इमारतीचे उद्घाटन झाले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापनेनंतर “माझ्या खिशाला पेन असतो, आपले चालते फिरते मंत्रालय आहे”, असे म्हटले होते. याचीच प्रचिती आज नंदुरबारकरांना आली आहे. नंदुरबारच्या दौऱ्यादरम्यान एका कार्यक्रमाच्या मंचावर बसलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन फिरवला आणि नंदुरबार नगर परिषदचा रखडलेला 7 कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करुन दिला. (cm eknath shinde dialed phone call sanctioned 7 crore rupees to nandurbar nagar parishad)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या फोननंतर कार्यक्रमातील उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. तसेच, सभागृहात एकच जल्लोष झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज नंदुरबार नगर परिषद नूतन इमारतीचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमानंतर छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरच्या आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली. यावेळी पालकमंत्री विजय कुमार गावित, खासदार हिना गावित, खनिकर्म मंत्री दादा भुसे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते.

- Advertisement -

नेमके काय घडले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमानिमित्त मंचावर बसलेले असताना शिंदे गटाचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे भाषण सुरु होते. यावेळी चंद्रकांत रघुवंशी यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची एक आठवण सांगितली. तसेच, विलासराव आलेले असताना त्यांनी 1 कोटी रुपयांचा निधी 3 दिवसात मंजूर केल्याचे सांगितले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मंचावरुनच अधिकाऱ्यांना फोन लावत 7 कोटी 28 लाख रुपयांचा निधी तत्काळ मंजूर करण्याचे आदेश दिले.

- Advertisement -

हेही वाचा – नारायण राणेंची किंमत चार आण्याचीच, अंबादास दानवेंचा खोचक टोला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -