Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मी राजकारणात नसतो तर... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खुलासा

मी राजकारणात नसतो तर… मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खुलासा

Subscribe

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर दोन्ही गटातील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिला धक्का हा भाजपला बसला. कारण भाजपातले दबंग नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर राज्यात खऱ्या अर्थाने शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. मात्र, अद्यापही महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल हा समोर आलेला नसून शिंदे-फडणवीस सरकारच्या मनात भीती अजूनही कायम आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारणात नसते तर प्लॅन बी म्हणून एकनाथ शिंदे कुठे असते? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘एबीपी माझा’या वृत्तवाहिनीच्या ‘महाकट्टा’ या कार्यक्रमात मोठा खुलासा केला.

मी राजकारणात नसतो तर आर्मीत असतो. माझं आर्मीत सिलेक्शन झालं होतं. आर्मी मेडीकल कोरमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. तेव्हा लखनौ माझं ट्रेनिंग सेंटर होतं. मी वॉरंट घेऊन दोन ते चार लोकांसोबत ट्रेनिंग सेंटरला निघालो होतो. पण हरियाणामध्ये माझ्या एका मित्राच्या बहिणीचं लग्न होतं. हरी परमार असं माझ्या मित्राचं नाव आहे. मी त्याला त्याच्या बहिणीच्या लग्नाला येईन असं आश्वासन दिलं होतं. माझा प्रवास लखनौच्या दिशेने सुरू झाल्यानंतर अचानक माझ्या लक्षात आलं. त्यानंतर मी त्या ट्रेनमधून उतरलो आणि दुसरी ट्रेन पकडून दिल्लीत गेलो. दिल्लीत बस पकडून त्याच्या ‘रोहतक’ या ठिकाणी गेलो आणि त्याच्या बहिणीच्या लग्नाला उपस्थिती लावली. त्यानंतर पुन्हा मी ट्रेनिंग सेंटरला गेलो. पण तारीख निघून गेल्यामुळे त्यांनी मला दुसरं वॉरंट घेऊन यायला सांगितलं. मात्र, त्यावेळी दंगल सुरू असल्यामुळे वॉरंट आणि इतर गोष्टी अशाच राहून गेल्या. पण मी शिवसैनिक झालोच ना, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

बाळासाहेब ते पंतप्रधानांपर्यंत दाढीची क्रेझ 

- Advertisement -

तुमच्यासारखीच दाढी श्रीकांत शिंदे ही ठेवतील का? असं विचारल्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, ज्याची त्याची चाॅईस, पण सध्या दाढीची क्रेझ आहे. आनंद दिघे यांची दाढी लोकप्रिय होती, त्यांना ठाण्याची दाढी बोललं जायचं. आता मलाही दाढी म्हटलं जातं. एवढचं काय बाळासाहेब ठाकरेंचीदेखील दाढी होती. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील दाढी आहे. तसंच यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दाढीचाही उल्लेख यावेळी केला.


हेही वाचा : मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं दाढी ठेवण्यामागचं कारण; म्हणाले, दाढीमध्ये ‘राज’


- Advertisement -

 

- Advertisment -