घरमहाराष्ट्रपैसे असताना ठाकरेंनी मुंबईकरांना विकासापासून वंचित ठेवलं- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पैसे असताना ठाकरेंनी मुंबईकरांना विकासापासून वंचित ठेवलं- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "गेली २५ वर्ष मुंबई महापालिकेत पैसे असताना..."

ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद तर आणखीनच तीव्र होत चालला असून एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीवर हल्ला चढवलाय. “मुंबई महापालिकेत पैसे असताना ठाकरेंनी मुंबईकरांना विकासापासून वंचित ठेवलं”, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांबाबत त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी विरोधकांवरच निशाणा साधला.

एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधताना हे वक्तव्य केलंय. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेचे बडे नेते शिंदे-फडणवीस सरकार लवकरच पडणार असल्याचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारीला लागले आहेत. अशात महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर वेगवेगळे आरोपसत्र सुरूच आहेत. या आरोपांना उत्तर देत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय.

- Advertisement -

“आमचा डोळा जनतेच्या विकासावर आहे, ठाकरे गटाने मुंबईकरांचा पैसा डिपॉझीटमध्ये टाकून मुंबईला खड्ड्यात टाकलं…गेली २५ वर्ष मुंबई महापालिकेत पैसे असताना विकासापासून वंचित ठेवलं त्यांना लोक बरोबर लक्षात ठेवतील.” असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटावर निशाणा साधलाय. काही दिवसांपूर्वीच झालेल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. ‘मुंबई महापालिकेच्या निवडणुका होईपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुक्काम दिल्लीऐवजी मुंबईतच असू शकतो,’ अशी टीका त्यांनी केली होती. यावर उत्तर देत एकनाथ शिंदेंनी खोचक सवाल उपस्थित केलाय. “मोदी मुंबईत आल्यास महाविकास आघाडीना पोटदुखी आणि अॅसि़डीटी का? आमच्या कामांमुळे विरोधकांना पोटशूळ कशाला?” असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले.

शिंदे गट आणि शिवसेनेची याचिका ही लिस्ट झाली असून उद्या सकाळी १०:३० वाजता सुनावणी होणार आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल कोणाच्या बाजून लागणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून भाजपसोबत स्थापन केलेलं सरकर हे घटनाबाह्य असल्याचा आरोप करण्यात येतोय. एकनाथ शिंदे यांनी या आरोपांना देखील उत्तर दिलंय.

- Advertisement -

“आमच्याकडे मेरीट आहे. ५० आमदार आमच्यासोबत आहेत. १२ खासदार आमच्यासोबत आहेत. त्यामुळे आम्हाला कसलीही भीती नाही. कोर्टाने मेरिटवर निर्णय घ्यावा हीच आमची भूमिका आहे. आम्हाला सरकार पडण्याची भीती नाही. आमची बाजू भक्कम आहे. त्यामुळेच मी कोर्टाच्या कोणत्याही निर्णयावर भाष्य करत नाही. काही बोलत नाही. कोर्टाला जो निर्णय द्यायचा तो कोर्ट देईल. कोर्टाने काय निर्णय द्यायचा हे आपल्या मनावर नाही”, असं शिंदे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -