घरमहाराष्ट्रआम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार; आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री शिंदेंचं पहिलं ट्विट

आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार; आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री शिंदेंचं पहिलं ट्विट

Subscribe

केंद्रीय निवडणुक आयोगाने आज शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाला दोन वेगवेगळी नावं दिली आहेत. यात निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह वापरण्यास परवानगी दिली आहे. तर शिंदे गटाकडून सादर केलेली चिन्ह निवडणूक आयोगाने नाकारत त्यांना 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत नवे चिन्ह देण्याचे निर्देश दिले आहेत. यात उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव मिळाले आहे तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना; असे नाव देण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय झाल्याचे म्हणत आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार… असल्याचा दावा केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत लिहिले की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार…. #बाळासाहेबांची_शिवसेना. एकनाथ शिंदे यांच्या ट्विटमुळे आता पुन्हा दोन्ही गटात राजकीय आरोप- प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -