घरताज्या घडामोडीविदर्भाला काय मिळालं?, विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

विदर्भाला काय मिळालं?, विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Subscribe

हिवाळी अधिवेशनात आज दोन्ही सभागृहात विदर्भाच्या विकासाचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. यावेळी विदर्भातील विकासाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप देखील झाले. मात्र, विदर्भाला काय मिळालं?, याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान सभेत दिली.

विदर्भाला काय मिळालं?

– नागपूरपासून विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा ‘इकॉनॉमिक कॉरिडॉर’ शक्तीपीठ महामार्ग विकसित करणार.

- Advertisement -

– नागपूर हे शहर ‘लॉजिस्टिक हब‘ म्हणून पुढे येणार.

– नागपूर, वर्धा या ठिकाणी पुढील काळात मोठ्या प्रमाणात ‘लॉजिस्टिक सपोर्ट‘ तयार होणार.

- Advertisement -

– नागपूर मेट्रो पहिला टप्पा लोकार्पण आणि दुसऱ्या टप्प्याचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ.

– नागपूर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-1 ला सुधारित ९२७९ कोटींच्या खर्चास मान्यता.

– वडसा देसाईगंज-गडचिरोली नवीन रेल्वे मार्गासाठी १ हजार ९६ कोटी इतक्या सुधारित खर्चास मान्यता. 

– विदर्भ, मराठवाडामधील औद्योगिक विकासाला चालना.

– ७० हजार कोटीच्या रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता. त्यापैकी विदर्भामध्ये एकूण ४४ हजार १२३ कोटी रुपयांची गुंतवणूक. ४५ हजार रोजगार निर्मिती होणार.

– गडचिरोली जिल्ह्यात २० हजार कोटी गुंतवणुकीचा खनिज उत्खनन प्रकल्प सुरू होईल. राज्याला महसूल मिळेल आणि रोजगारामुळे नक्षलवाद संपृष्टात येईल.

– सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी ७५५ कोटी रुपये निधी वितरित अमरावती, नागपूर, पुणे विभागातील १४ जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २२२ कोटी ३२ लाख रुपये वितरित.

– सोयाबीनवर शंखी गोगलगाईमुळे ५ जिल्हयात ७३ हजार हेक्टर क्षेत्र बाधित, ९८.५८ कोटी इतका निधी.

– भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेस गती देण्यासाठी ३३६ कोटी २२ लाख सुधारित खर्चास मान्यता.

– बुलडाणा जिल्ह्यातील अरकचेरी आणि आलेवाडी बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित मान्यता, यामुळे सुमारे १९१८ हेक्टर जमिनीला सिंचनाचा फायदा होईल.

– लोणार सरोवराच्या पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यासाठी ३६९ कोटी ७८ लाख रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी.

समृद्धी महामार्गाशी संलग्न जिल्ह्यांत विदर्भ-मराठवाडा असे टुरिझम सर्कीट

– समृद्धी महामार्गाचा उपयोग करून आम्ही विदर्भ-मराठवाडा टुरिझम सर्किट तयार करणार.

– गोसीखुर्द येथे १०० एकर जागेवर जागतिक दर्जाचा जल पर्यटन प्रकल्प उभारणार.

– भंडारा –गोंदिया मेगा सर्किटमध्ये या दोन्ही जिल्ह्यांमधील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी २८ कोटी ९१ लाख रुपये खर्च.

– भंडारा जिल्ह्यात गोसीखुर्द, यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा, संभाजीनगर यांचा स्वदेश दर्शन योजनेत समावेश होणार.

– अंचलेश्वर, कचारगड लेणी, भोजाजी महाराज, कोराडी देवी, तसेच नांदेड जिल्ह्यातील मंदिरांचे प्रस्तावकेंद्र शासनाच्या प्रसाद योजनेत समाविष्ट होणार.


हेही वाचा : विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -