रक्षाबंधनसारख्या पवित्र नात्याचे कुणीही राजकारण करू नये; भावना गवळींचा उद्धव ठाकरेंना टोला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव नेस्को येथे गटनेत्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्याच उपस्थित गटप्रमुख संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा, शिंदे गट आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव नेस्को येथे गटनेत्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्याच उपस्थित गटप्रमुख संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा, शिंदे गट आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. त्याचवेळी “मला पंतप्रधानाचे आश्चर्य वाटते, ज्या बाईवर आरोप केले तिच बाई मिळाली का तुम्हाला राखी बांधायला”, असा थेट सवाल करत उद्धव ठाकरे यांनी भावना गवळी यांच्यावर निशाणा साधला. त्याच्या या वक्तव्यानंतर आता भावना गवळी यांनी “कालपर्यंत मी त्यांची ताई होते, आज लगेच बाई झाले. रक्षाबंधनसारख्या पवित्र नात्याचे कुणीही राजकारण करू नये”, अशा शब्दांत ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.

“काल मी त्यांची ताई होती आज बाई झाले. रक्षाबंधनसारख्या पवित्र नात्याचे कुणीही राजकारण करू नये. मागील अनेक वर्षांपासून मी माझ्या मतदार संघातील एक लाखा पेक्षा जास्त बांधवाना राख्या पाठवते. या आधीही मी अनेक मंत्री, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनाही राखी बांधली आहे”, अशा शब्दांत भावना गवळी यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.

उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर एकदिवसीय दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले. याशिवाय आज दिल्लीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसेच, भावना गवळी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर दिले. “भावना गवळींच्या वडिलांनी आयुष्य शिवसेनेसाठी घालवले. भावना गवळी तर लहान असल्यापासून खासदार आहेत. त्यांच्यावर मोदींना राखी बांधण्यावरून टीका केली. तुम्हाला राखी बांधण्याचे काय महत्व असणार. ज्या महिलेने शिवसैनिकांचे नेतृत्व केले, एवढी वर्षे तिने पक्षाची सेवा केली, तिच्याविरोधात असे बोलतात. मी मर्द आहे, हे काल बोलले नाहीत. मोदींच्या कामासमोर तुम्ही नखाएवढे पण नाहीत”, अशी टीका नारायण राणे यांनी केली.


हेही वाचा – पुण्यात आपच्या कार्यकर्त्यांनी अडवला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा ताफा