Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी दावोसमध्ये मोदींचे आकर्षण आणि महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक.., मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

दावोसमध्ये मोदींचे आकर्षण आणि महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक.., मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसवरुन परतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या गुंतवणूक कराराची माहिती दिली. मुंबई विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आदी नेते त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. दरम्यान, दावोसमध्ये मोदींचे आकर्षण आणि महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत देशाची या दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमवर छाप पाहायला मिळाली. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची उत्सुकता सर्व भारतीयांमध्ये होती. एक प्रकारचं आकर्षण पाहायला मिळालं. विविध देशाच्या लोकांशी भेटून मी चर्चा केली. काही देशांचे मंत्री आणि पंतप्रधान देखील तिथे उपस्थित होते. विविध देशातील लोकांनी महाराष्ट्र पॅव्हेलियनला आर्वजून भेट दिली. ही आपल्या राज्यासाठी मोठी गोष्ट आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

विविध सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्याासठी त्यांनी तयारी दाखवली आणि एमओयू देखील साइन करण्यात आले. या एमओयूचं खरं म्हणजे प्रदर्शन होणार आहे. नुसते करार करण्यासाठी हे काही झालेलं नाहीये. तर त्यांनी महाराष्ट्र सरकारवर विश्वास दाखवला. १ लाख ३७ हजारांचे एमओयू झाले आहेत. याची अंमलबजावणी लवकरात लवकर होणार आहे. जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील. ज्या लोकांना मी भेट दिली, ते विविध देशातील पक्षाचे प्रमुख लोकं होते. ते मुंबईत येऊन एमओयू साइन करणार आहेत. तसेच हे सामंजस्य करार फक्त कागदावरच राहणार नसून ते प्रत्यक्षात उतरतील, अशी आशाही एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली.

- Advertisement -

महाराष्ट्र प्रो इंडस्ट्री आणि डेव्हलपमेंट राज्य आहे. राज्यात जे गुंतवणूकदार येथे येतील. त्यांना आम्ही रेड कार्पेट देऊ. तसेच त्यांना सबसिडी, टॅक्स बेनिफीट आणि जे उद्योगधंदे राज्यात येतील त्यांना चांगल्या प्रकारे पॅकेज देऊ. याबाबतचा निर्णय आम्ही कॅबिनेटच्या बैठकीत पूर्वीच घेतला होता. उद्योगांना चालना देण्यासाठी आणि उद्योजकांना आपल्या राज्यात येण्यासाठी आकर्षित करणं, असं धोरण ठरवलं होतं. विदर्भात देखील २० हजार कोटींच्या प्रकल्पाबाबत एमओयू झालं आहे, असं शिंदे म्हणाले.

दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये राज्याच्या वतीने मी त्याठिकाणी उपस्थित होतो. उद्योगमंत्री आणि सर्व विभाग तिथे उपस्थित होता. दावोसच्या दौऱ्याबद्दल मी खूप आनंदी आणि समाधानी आहे. खऱ्या अर्थाने दावोसच्या दौऱ्याचं हे फलीत आहे. राज्यासाठी जवळपास १ लाख ३७ हजार कोटींचे एमओयू झाले आहेत. हा दौरा अतिशय फ्रूटफुल ठरला आहे. दावोसमध्ये जगभरातील विविध देशातील लोकं तिथे उपस्थित होती. इंडियन आणि महाराष्ट्र पेव्हिलियन अगदी जवळजवळ होतं, असंही शिंदे म्हणाले.


हेही वाचा : एक लाख ३७ हजार कोटींची गुंतवणूक, उद्योजकांना रेड कार्पेट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -