घरमहाराष्ट्रAaditya Thackeray : महाराष्ट्रातील गँगवॉरचे मुख्यमंत्री लीडर, आदित्य ठाकरेंचा आरोप

Aaditya Thackeray : महाराष्ट्रातील गँगवॉरचे मुख्यमंत्री लीडर, आदित्य ठाकरेंचा आरोप

Subscribe

मुंबई : कल्याण लोकसभा मतदार संघातील उल्हासनगर हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातच कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड सध्या पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या गँगवॉरचे लीडर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचा आरोप केला आहे. (CM Eknath Shinde leader of Gangwar in Maharashtra, Aaditya Thackeray allegation)

हेही वाचा… Uddhav Thackeray : “…तर मग सामान्य जनतेचे काय होणार?” गोळीबार प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

- Advertisement -

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज (ता. 04 फेब्रुवारी) पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेतून त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधला. याचवेळी त्यांनी गोळीबार प्रकरणाबाबत आपले मत व्यक्त केले. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘कॅबिनेट मीटिंग’मध्ये कायदा व सुव्यवस्था राहिली आहे का? सरकारमधील आमदार गणपती मिरवणुकीत पिस्तूल काढतात, पोलीस ठाण्यात गोळीबार करता आणि अशा आमदारांना सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष केले जाते. तर यांचे अधिकारी महिलेवर गाडी चालवतात, आमदाराचा मुलगा अपहरण करतो हे सगळं कॅमेरामध्ये कैद होत आहे. यांच्यावर UAPA कायद्याने कारवाई व्हायला हवी होती. आता भाजपाने त्यांची अधिकृत भूमिका या प्रकरणांमध्ये सांगावी, असे आव्हान आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आले आहे.

या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी प्रकल्प उद्घाटनावरून सरकारला खडेबोल सुनावले. कोस्टल रोडचे काम पूर्ण न करता श्रेय घेण्याचा प्रकार सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पणाचे कार्यक्रम होत आहेत. कोस्टल रोडच्या पहिल्या 10 किमीचे लोकार्पण पीएम मोदींकडून होत आहे. पण ज्यावेळी एमटीएमएचएल सी लिंकचे काम पूर्ण झाले होते, तरी त्याचे उद्घाटन हे तीन ते चार महिन्यानंतर करण्यात आले. हे असे यासाठी कारण त्यावेळी निवडणुका नव्हत्या. आता निवडणुका आल्याने यांनी उद्घाटनांचा घाट घातला आहे, असा आरोपच आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आला आहे. तर, मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या माथ्यावरील गद्दारीचा डाग डीप क्लीन करावा, असा टोलाही आदित्य यांनी लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -