…तशीच परीक्षा व्हावी, MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांबद्दल मुख्यमंत्र्यांचं एमपीएससीला पत्र

MPSC परीक्षेच्या नव्या पेपर पॅटर्नविरोधात विद्यार्थ्यी चांगलेच आक्रमक झाले आहेत. २०२५ पासून नवा पेपर पॅटर्न लागू करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. यासाठी राज्यातील काही भागात आंदोलन देखील करण्यात आले. दरम्यान, MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (एमपीएससी) पत्र दिलं आहे. हे पत्र लोकसेवा आयोगाला दिलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे ते चर्चेत आले आहेत.

एमपीएससी विद्यार्थ्यांची भूमिका आणि त्यांच्या भूमिकेसोबत सरकार सहमत आहे आणि तशीच परीक्षा व्हावी, असं या पत्रामधून लिहिण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ही पद्धत २०२५ पासून लागू करण्याची मागणी होती, त्याप्रमाणे एमपीएससीला आम्ही पत्र लिहिलेलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. कालही आम्ही पत्र दिलेलं आहे आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या भूमिकेसोबत सरकार सहमत आहे आणि तशीच परीक्षा व्हावी, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

दोन दिवसापासून विद्यार्थ्याचं आंदोलन सुरु आहे. आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे काल रात्री आंदोनस्थळी पोहोचले होते. त्यांनी फोनवरुन एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. सध्या विद्यार्थी त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. जोपर्यंत लेखी आदेश निघत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

एमपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी लागू करण्यात आलेला नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा. तसंच परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुलांना किमान ५ ते ६ महिन्यांचा वेळ मिळावा, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे.


हेही वाचा : …तशीच परीक्षा व्हावी, MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांबद्दल मुख्यमंत्र्यांचं निवडणूक आयोगाला पत्र