घरताज्या घडामोडीकर्नाटकाकडून जतला पाणी मिळताच मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

कर्नाटकाकडून जतला पाणी मिळताच मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

Subscribe

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील 40 गावांवर काही दिवसांपूर्वी दावा केला होता. शिवाय अक्कलकोट आणि सोलापूर हे देखील कर्नाटकचाच भाग असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद पुन्हा उपस्थित झाला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील 40 गावांवर काही दिवसांपूर्वी दावा केला होता. शिवाय अक्कलकोट आणि सोलापूर हे देखील कर्नाटकचाच भाग असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद पुन्हा उपस्थित झाला. या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जतमधील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तब्बल 2 हजार कोटींचं टेंडर काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. (cm eknath shinde made a big announcement that jat taluka will get justice )

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद मागच्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे. परंतु सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्याला पाणी नसल्याने कर्नाटक सरकारने तालुक्याच्या दुष्काळी भागात पाणी सोडल्याने महाराष्ट्र सरकारला एकप्रकारे आव्हान दिले आहे.

- Advertisement -

दरम्यान, जत तालुक्यातील 40 गावांना कर्नांटक सरकारने पाणी दिल्याने या 40 गावांनी कर्नाटकात विलीन होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलच तापले होते. या सगळ्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पाऊले उचलत जतमधील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तब्बल 2 हजार कोटींचं टेंडर काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जत तालुक्यातील काही लोकांनी भट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तालुक्यातील लोकांच्या समस्या ऐकून घेत जानेवारीमध्ये 2 हजार कोटींचे टेंडर काढणार असल्याचे आश्वासन दिले. रात्री दीड वाजता जतमधील लोक आले होते. त्यांनी जत तालुक्याचा नकाशा आणला होता यावेळी नकाशावर त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. आम्ही तुमच्यासाठी 2 हजार कोटींचं टेंडर काढत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी प्रवीण दरेकरांना क्लिनचीट, आरोपपत्रातून संचालकांचेही नाव वगळले

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -