घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्येष्ठ शिवसैनिक लीलाधर डाके यांच्या भेटीला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्येष्ठ शिवसैनिक लीलाधर डाके यांच्या भेटीला

Subscribe

एकनाथ शिंदे सध्या जुन्या शिवसैनिकांना आपल्या गटात वळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याआधी त्यांनी गजानन कीर्तिकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता लीलाधर डाके यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी शिवसेनेतील ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांची (Leeladhar Dake) त्यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी जाऊन  भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी डाके यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. तसेच त्यांना निरोगी दीर्घायुष्य मिळावे अशी मनोकामना व्यक्त केली. यावेळी शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर, आमदार संजय शिरसाट आणि माजी आमदार अशोक पाटील हेदेखील सोबत उपस्थित होते. लीलाधर डाके हे शिवसेनेतील ज्येष्ठ नेते असून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत.

एकनाथ शिंदे सध्या जुन्या शिवसैनिकांना आपल्या गटात वळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याआधी त्यांनी गजानन कीर्तिकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता लीलाधर डाके यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्री आपला मुक्काम दिल्लीत हलवतील असं वाटतंय, संजय राऊतांचा खोचक टोला

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाविरोधात बंडखोरी करत ४० आमदारांना घेत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. आता ते शिवसेनेवर दावा करत असून पक्षाच्या चिन्हावरही दावा करणार आहेत. त्यासाठी त्यांना निश्चितच शिवसैनिकांची गरज लागणार आहे. त्यामुळे ते सध्या शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात लवकरच सत्तांतर होणार, संजय राऊतांकडून सूचक वक्तव्य

शिवसेनेतील ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. तर, गजानन कीर्तिकर यांची भेट घेऊन त्यांच्या मुलाला खासदारकीची उमेदवारी देऊ असं आश्वासन देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, आज त्यांनी लीलाधर डाके यांची भेट घेतली. स्थानिक आमदार मंगेश कुडाळकरसह मुख्यमंत्र्यांनी लीलाधर डाके यांची भेट घेतली.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -