घरताज्या घडामोडीविरोधकांच्या पोटात नुसती आग म्हणून.., बॅनरबाजीतून रामदास कदमांचा इशारा

विरोधकांच्या पोटात नुसती आग म्हणून.., बॅनरबाजीतून रामदास कदमांचा इशारा

Subscribe

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी उद्या (रविवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडमध्ये सभा होणार आहे. त्यासाठी शिवसेनेकडून जोरदारी तयारी केली जात आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि त्यांचे चिंरजीव आमदार योगेश कदम यांनी या सभेचा टीझर पोस्ट केला आहे. दरम्यान, खे़डमध्ये बॅनरबाजी करण्यात आली असून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

करारा जवाब मिलेगा, विरोधकांच्या पोटात नुसती आग, मैदानात उतरला ढाण्या वाघ, अशा आशयाचे बॅनर रामदास कदम यांनी लावले आहेत. तसेच करारा जवाब मिलेगा असं म्हणत विरोधकांना एक इशाराच दिला आहे.

- Advertisement -

योगेश कदम यांना पाडण्याचा प्रयत्न

माझे चिरंजीव योगेश कदम यांनी उद्धव ठाकरेंचं आव्हान स्वीकारलं आहे. कारण त्यांना राजकारणातून संपवण्याचा विढा उद्धव ठाकरे यांनी उचलला होता आणि आजही उचलला होता. संजय कदम यांना तिकीट देण्यासाठी तीन वेळा मातोश्रीवर बोलावण्यात आलं होतं. परंतु माझ्या दबावामुळे हे शक्य झालं नाही. परंतु त्यांना तिकीट देऊन पाडण्याचा प्रयत्न केला. योगेश कदम यांना पाडण्याचेही प्रयत्न झाले, अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी एका वृत्तवाहिनीला दिली.

- Advertisement -

५ मार्च रोजी उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये सभा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. आता त्याच मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या सभा होत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे उद्या काय बोलणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


हेही वाचा : मोठी बातमी! शेतकऱ्यांचा लाँग मार्च स्थगित, ७० टक्के मागण्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -