घरमहाराष्ट्रठाकरेंना उत्तर देण्यासाठी खेडच्या त्याच मैदानात आज सभा; काय बोलणार मुख्यमंत्री?

ठाकरेंना उत्तर देण्यासाठी खेडच्या त्याच मैदानात आज सभा; काय बोलणार मुख्यमंत्री?

Subscribe

५ मार्चला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खेडच्या गोळीबार मैदानात जाहीर सभा घेतली होती. त्या सभेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा त्याच मैदानावर आज सायंकाळी ५ वाजता सभा होणार आहे.

5 मार्चला माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खेडच्या गोळीबार मैदानावर जाहीर सभा घेतली होती. या सभेमधून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर निशाणा साधला होता. त्यामुळे याला प्रत्युत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील याच गोळीबार मैदानावर आज सभा होणार आहे. संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या सर्व नेत्यांच्या, आमदारांच्या आणि खासदारांच्या उपस्थितीत ही सभा घेण्यात येणार आहे. मुळात शिवसेनेचे रामदास कदम यांचा बालेकिल्ला असलेल्या खेडमध्ये उद्धव ठाकरे यांनी सभा घेण्याआधीच रामदास कदम यांच्याकडून आजच्या सभेची घोषणा करण्यात आलेली होती. त्यामुळे या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह रामदास कदम देखील नेमकं काय बोलणार आहेत? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

शिवसेनेकडून या सभेची जोरदार तयारी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. या सभेच्या काही तास आधीच रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांनी या सभेबाबतचा एक टिझर पोस्ट केलेला आहे. योगेश कदम यांनी व्हिडिओच्या माध्यमातून “शिवसेना निष्ठावंतांचा यल्गार” असं म्हणत हा टीजर त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केलेला आहे. त्यामुळे तेच ठिकाण आणि तेच मैदान असल्याने या सभेकडे राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या या सभेसाठी खेडमध्ये जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. “करारा जवाब मिलेगा.. विरोधकांच्या पोटात नुसती आग… मैदानात उतरला ढाण्या वाघ..” अशा आशयाचे बॅनर रामदास कदम यांनी खेडमध्ये लावलेले पाहायला मिळत आहे. तर करारा जवाब मिलेगा, असं म्हणत विरोधकांना रामदास कदम यांच्याकडून एक इशारा देण्यात आलेला आहे.

- Advertisement -

दमाझे चिरंजीव योगेश कदम यांनी उद्धव ठाकरेंचं आव्हान स्वीकारलं आहे. कारण त्यांना राजकारणातून संपवण्याचा विढा उद्धव ठाकरे यांनी उचलला होता आणि आजही उचलला होता. संजय कदम यांना तिकीट देण्यासाठी तीन वेळा मातोश्रीवर बोलावण्यात आलं होतं. परंतु माझ्या दबावामुळे हे शक्य झालं नाही. परंतु त्यांना तिकीट देऊन पाडण्याचा प्रयत्न केला. योगेश कदम यांना पाडण्याचेही प्रयत्न झाले, अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी एका वृत्तवाहिनीला दिली होती. ज्यामुळे रामदास कदम यांच्याकडून करण्यात आलेल्या या आरोपांमुळे शिवसेना विरुद्ध ठाकरे गट हा वाद आता आणखीनच तापलेला आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजच्या सभेमध्ये नेमकं काय बोलणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.


हेही वाचा – विरोधकांच्या पोटात नुसती आग म्हणून.., बॅनरबाजीतून रामदास कदमांचा इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -