घरमहाराष्ट्रशरद पवारांची प्रकृती ठीक; मुख्यमंत्री शिंदेंनी भेट घेत केली विचारपूस

शरद पवारांची प्रकृती ठीक; मुख्यमंत्री शिंदेंनी भेट घेत केली विचारपूस

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रकृतीच्या कारणास्तव मागील तीन दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र आता त्यांची प्रकृती ठीक असल्याने शनिवारी ( 5 नोव्हेंबर) सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. दरम्यान रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते शिर्डीतील पक्षाच्या शिबीरात उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

रुग्णालयातून निघाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शरद पवार यांची प्रकृती उत्तम आहे, उद्या ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराला जाणार आहेत. यानंतर ते रुग्णालयात उपचारासाठी ते पुन्हा रुग्णालयात येणार आहेत.

- Advertisement -

पक्षाच्या शिबिरानंतर शरद पवार चाचण्या, तपासणीसाठी रुग्णालयात येणार आहेत. ज्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल. त्यांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो.

शिर्डीमध्ये शनिवारी राष्ट्रवादीचं शिबिर होणार आहे. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही रुग्णालयातून थेट शिबिरात पोहचणार आहेत. शनिवारी सकाळी ते मुंबईहून हेलिकॉप्टरने शिर्डीत दाखल होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ‘राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा’ या शिबिराचा आज पहिला दिवस पार पडला. यामध्ये अजित पवार, जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.


हेही वाचा : हिवाळी अधिवेशन १२ डिसेंबर पासून?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -