आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

eknath shinde

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झाले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सदिच्छा भेटीसाठी दिल्लीत आल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. दिल्लीत दाखल झाल्यानंतर ते महाराष्ट्र सदनात दाखल झाले आहेत. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आम्ही आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहोत. तर उद्या पीएम नरेंद्र मोदींची भेट घेणार आहोत, अशी माहिती शिंदेंनी दिली.

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. या याचिकेवर ११ जुलैला सुनावणी होणार आहे. यासंदर्भात शिंदे म्हणाले की, आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे. लोकशाहीत घटना, कायदा आणि नियमावर आधारित न्यायव्यवस्था निर्णय देत असते. त्यामुळे न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. कायदा आणि घटनेमध्ये ज्याप्रकारे तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्याबाबत आम्ही निर्णय घेतला आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. तसेच ते गृहमंत्री आणि पंतप्रधानांशी चर्चा करणार आहेत. नरेंद्र मोदींच्या सदिच्छा भेटीसाठी आम्ही आलो आहोत. त्यांची भेट घेऊन आम्ही त्यांच्याशी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मोदी आणि शाह यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.


हेही वाचा : एनएसई घोटाळ्याशी संजय पांडेंचा काय संबंध?, वाचा सविस्तर