बाळासाहेबांनी कधीही सत्तेसाठी तडजोड केली नाही, मुख्यमंत्रीपदासाठी…; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या तैलचित्राचे अनावरण विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात आज झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तैलचित्राचे अनावरण केले. बाळासाहेब प्रखर हिंदुत्ववादी होते. त्यांच्यात ओतप्रेत राष्ट्रभक्ती भरली होती. त्यांनी कधीही मतांवर डोळा ठेवून राजकारण केले नाही. सत्ता स्थापन झाली असती पण त्यांनी सत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी तडजोड केली नाही, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

बाळासाहेब प्रखर हिंदुत्ववादी होते. त्यांच्यात ओतप्रेत राष्ट्रभक्ती भरली होती. त्यांनी कधीही मतांवर डोळा ठेवून राजकारण केले नाही. सत्ता स्थापन झाली असती पण त्यांनी सत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी तडजोड केली नाही. विचारांशी त्यांनी तडजोड केली नाही. हेही आम्ही त्यांच्याकडून शिकलो. ही शिकवण त्यांचीच. त्यांचाच आदर्श ठेवून आम्ही कार्य करत आहोत. स्वतःसाठी त्यांनी रिमोट कंट्रोल चालवला नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे. माझ्यासारखे सर्वसामान्य शिवसैनिक या विधानसभा आणि लोकसभेपर्यंत पोहोचू शकले. व्यासपीठावर अनेकजण आहेत. तसेच समोरही बसले आहेत. माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते वयाच्या १६ व्या वर्षापासून प्रभावित झाले. त्यांच्या पगडा विचारांचा आणि प्रभाव त्यांची भाषणं ऐकत आणि पाहत, तसेच त्यांनी दिलेली भाषणं ऐकत. त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. बाळासाहेबांच्या विचारांचा सरकार आपण स्थापन केलं. मी मुख्यमंत्री असताना आज या विधानभवनाच्या सर्वोच्च सभागृहात आणि सेंट्रल हॉलमध्ये बाळासाहेबांचं तैलचित्र लावलं जातंय हा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा क्षण आहे. त्यामुळे मी बाळासाहेबांना पुन्हा एकदा वंदन करतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबातला मुलगा या राज्याच्या मुख्यमंत्री कसा झाला असता?, या राज्यातला मंत्री, खासदार, आमदार कसा होऊ शकला असता. ही जादू केवळ आणि केवळ बाळासाहेबांचीच आहे. बाळासाहेबांचे विचार ऐकताना अंगात ताकद आणि ऊर्जा येते. प्रत्येकाला प्रेरणा आणि स्फूर्ती मिळते. अन्यायविरुद्ध लढण्याचं बळ मिळतं. ही बाळासाहेबांची शिकवण आहे. त्यांच्याबदद्ल बोलताना कंठही दाटून येतो. बाळासाहेबांचा शब्द म्हणजे शब्दच. शब्द फिरवायचा नाही ही त्यांची शिकवण आम्ही शिकलो. अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण त्यांनी दिली. त्यामुळेच या महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडल्या, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.


हेही वाचा : वारसा हा वास्तूंचा नसून तो विचारांचा असतो – मनसेप्रमुख राज ठाकरे