घरताज्या घडामोडीआदित्य ठाकरेंच्या जवळच्या अधिकाऱ्याची बदली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दणका

आदित्य ठाकरेंच्या जवळच्या अधिकाऱ्याची बदली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दणका

Subscribe

मुंबई महानगरपालिकेतील सहाय्यक महापालिका आयुक्त किरण दिघावकर यांची दादरमधील मुंबई पालिकेच्या प्रभाग कार्यालयातून भायखळ्याला बदली करण्यात आली आहे.

राज्यात नवीन सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे काही निर्णय आणि विकासकामांना स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. मेट्रो कारशेडचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे. शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या जी नॉर्थ वॉर्डाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांची बदली यांची केली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या अधिकाऱ्याची आता बदली केल्यामुळे हा ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर वेगाने काम करण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा आता पुन्हा दुसऱ्या विभागांमध्ये बदली करण्यात येत आहे. पहिले अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत असून आपत्ती व्यवस्थापनाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या ३ प्रशासकीय अधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

- Advertisement -

मुंबई महानगरपालिकेतील सहाय्यक महापालिका आयुक्त किरण दिघावकर यांची दादरमधील मुंबई पालिकेच्या प्रभाग कार्यालयातून भायखळ्याला बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी प्रशांत सपकाळे यांना नियुक्त करण्यात आले आहे. प्रशांत सपकाळे पश्चिम उपनगरातील के/पूर्व प्रभाग कार्यालयाचे प्रमुख आहेत. सपकाळेंच्या जागी प्रभागाचे प्रभारी मनीष वलूंज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिघावकर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे अधिकारी मानले जातात.

यात किरण दिघावकर ऑगस्ट २०१८ पासून मुंबई महानगरपालिकेच्या जी नॉर्थ वॉर्डाचे सहाय्यक आयुक्त म्हणून काम पाहत होते. दरम्यान नियमांनुसार, कोणत्याही अधिकाऱ्याची तीन वर्षांनी बदली केली जाते. त्यामुळे किरण दिघावकर यांचीही तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ही बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

शिवसेना- शिंदे गट आमने सामने

शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर ५० आमदारांचा संख्याबळ असलेल्या शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केलं आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी व्हिप जारी केला होता. तर शिंदे गटाकडूनसुद्धा भरत गोगावले यांनी व्हिप जारी केला होता. शिंदे गटात दोन तृतीयांशपेक्षा जास्त सदस्य असल्यामुळे शिंदे गटच अधिकृत शिवसेना असल्याचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला आहे. व्हिपवरुन शिवसेना आणि शिंदे गट आमने सामने आला आहे.


हेही वाचा : विक्रोळीत पंचशील नगर येथे घरांवर कोसळली दरड, बचावकार्य सुरू

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -