Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले कामातून उत्तर

विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले कामातून उत्तर

Subscribe

मुख्यमंत्री शिंदे हे गावी सुट्ट्यांवर गेले असले तरी त्यांची शासकीय कामे थांबलेली नसल्याचेच दिसून येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या गावात बसून काम करत आहेत.

राज्यात सध्या राजकारणाचे वेगळेच वारे वाहत असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे नाराज असल्याने त्यांनी आपल्या शासकीय कामातून तीन दिवसांची सुट्टी घेऊन ते गावी गेल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातील दरे या गावात आहेत. तर तिथले त्यांच्या कामांचे व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येत आहेत. पण मुख्यमंत्री शिंदे हे गावी सुट्ट्यांवर गेले असले तरी त्यांची शासकीय कामे थांबलेली नसल्याचेच दिसून येत आहेत.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून ते अनेकदा 24 तास काम करतात, असे त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून आणि मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांकडून सांगण्यात येते. याची अनेकदा प्रचिती देखील आलेली आहे. पण आता मुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्या गावी गेलेले असताना देखील तीन दिवसांत 65 फाइल्स निकाली काढल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने जाहीर केलेल्या परिपत्रकाच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निरोप देताना पत्नी लता शिंदेंच्या डोळ्यात पाणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या गावात बसून काम करत आहेत. ते कामावर नसताना देखील सचिवालयातील फाइल्स थांबून राहू नये आणि त्यांच्या गैरहजर असण्याने कोणतेही काम रखडून राहू नये, यासाठी त्यांनी व्हिसीच्या माध्यमातून अतिरिक्त मुख्य सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन विविध विभागांच्या 65 फाईल्समधील विषय मार्गी लावल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे हे तीन दिवसांच्या सुट्टीवर गेल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत होती. ते नाराज आहेत, म्हणून ते सुट्टीवर गेले आहेत, असेही विरोधकांकडून बोलले जात होते. पण विरोधकांच्या या टीकेला उत्तर देताना “आम्ही टीकेला टीकेतून उत्तर देणार नाही तर कामातून उत्तर देणार आहोत,” असा टोला शिंदेंकडून लगावण्यात आला होता.

राज्यात सध्या वेगवेगळ्या चर्चा करण्यात येत आहेत. अजित पवार यांचे अचानक नॉट रिचेबल राहणे, महाविकास आघाडीमध्ये बिघाड होणे, एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे समजणे, भाजपचे दिल्लीतील हायकमांड सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज आहेत, अशी चर्चा होणे, यांमुळे राज्यातील राजकारणात येत्या काही दिवसांत अथवा महिन्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या सगळ्यांकडे आता प्रत्येकाचे लक्ष लागलेले आहे.

- Advertisment -