Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी शरद पवारांची सदिच्छा भेट; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं ‘हे' कारण...

शरद पवारांची सदिच्छा भेट; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं ‘हे’ कारण…

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास ४० मिनिटं चर्चा झाली. या दोघांच्या भेटीमागचं कारण समोर आलेलं नव्हतं. मात्र, या भेटीत शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा मंदिर संस्थेच्या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं आहे.

- Advertisement -

या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शरद पवारांसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. ही फक्त सदिच्छा भेट होती आणि मराठा मंदिर संस्थेच्या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी ही भेट होती. तसेच या भेटीत कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही, असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिलं.

मराठा मंदिर संस्थेला ७५ वर्षे पूर्ण झाले आहेत. यानिमित्त कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी शरद पवार वर्षा बंगल्यावर आले होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

राष्ट्रवादीची दिल्लीतील कुस्तीपटूंसाठी मोहीम : जयंत पाटील

दिल्लीतील कुस्तीपटूंचे आंदोलन महाराष्ट्रातील खेळाडूंपर्यंत पोहोचवण्यासाठी. त्यांच्या या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष #Ncp with Champions ही मोहिम सुरु करणार आहे. या मोहिमे अंतर्गत राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आणि पदाधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील खेळाडूंना भेटतील. त्यांच्यातील संवाद साधतील. दिल्लीतील आंदोलनाची माहिती खेळाडूंनी देतील. त्यांची आंदोलनाबाबतची प्रतिक्रिया जाणून घेतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी दिली. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जयंत पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून हे फर्मान जारी केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सदैव खेळाडूंच्या पाठिशी उभा राहिला आहे. शरद पवार यांचे खेळांडूशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. खो-खो, कबडी, क्रिकेट व कुस्तीसाठी अनेक महत्त्वाच्या योजना शरद पवार यांनी सुरु केल्या. खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. संधी देण्याचं काम केलं. अनेक खेळाडूंना अडचणीच्या काळात शरद पवार यांनी मदत केली आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितलं.

हेही वाचा : Breaking : #Ncp with Champions राष्ट्रवादीची दिल्लीतील कुस्तीपटूंसाठी मोहीम; जयंत पाटील

जयंत पाटील म्हणाले, खेळाडू देशाचे नाव लौकीक करतात. देशासाठी पदकं घेऊन येतात. मात्र कुस्तीपटूंना वाईट वागणूक दिली जात आहे. कुस्ती महासंघाच्या प्रमुखांना महिला कुस्तीपटूंचा छळ केला. त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली. एका अल्पवयीन कुस्तीपटूने लैंगिक छळाची तक्रार केली. पोलिसांनी कोणत्याही तक्रारीची दखल घेतली नाही. अखेर कुस्तीपटूंना सर्वोच्च न्यायालयात जावे लागले. सर्वाेच्च न्यायालयाने दणका दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदवला. यासाठी खेळाडूंना दिल्लीत आंदोलन करावे लागले

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी कुस्तीपटू आंदोलकांना दिल्ली पोलिसांनी अत्यंत वाईट वागणूक दिली. त्यांना हिसकावून तेथून बाहेर काढण्यात आलं. या घटनेमुळे देशात अस्वस्थता पसरली आहे. खेळाडूंमध्ये रोष आहे. चिंता आहे. खेळाडूंंचे मनोधैर्य खचले आहे. राष्ट्रवादी नेहमीच खेळाडूंच्या पाठिशी राहिली आहे. खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी राष्ट्रवादी एक मोहिम सुरु करत आहे. आमदार, खासदार आणि पदाधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील खेळाडूंची भेट घ्यावी. त्यांची बैठक घ्यावी.  त्यांना दिल्लीतील आंदोलनाची माहिती द्यावी. या आंदोलनाबाबतचे त्यांचे मत जाणून घ्यावे


हेही वाचा : पवार मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला, थोड्याच वेळात करणार मोठी घोषणा


 

- Advertisment -