मुख्यमंत्र्यांची त्यांच्या ‘होम मिनिस्टर’ साठी खास भावनिक पोस्ट

लता शिंदे(lata eknath shinde) यांचा आज ११ जुलै रोजी वाढदिवस आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या साठी एक भावनिक पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM eknath shinde) हे या नावाला महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळं वलय प्राप्त झालं आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षात बंड केले आणि भाजप सोबत नवीन सरकार राज्यात स्थापन केले. राजकारणातला हा गदारोळ संपूर्ण महाराष्ट्रानेच पाहिला. एकनाथ शिंदे हे शिंदे घराण्यातली पहिलेच मुख्यमंत्री झाले आहेत. सध्याचे हे दिवस शिंदे कुटुंबासाठी सुवर्ण काळ आहे. एक शाखाप्रमुख ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा एकनाथ शिंदे यांचा प्रवास आणि या प्रवासात एकनाथ शिंदे यांना मोलाची साथ दिली ते म्हणजे त्यांच्या ‘होम मिनिस्टर’ अर्थात त्यांच्या पत्नी ‘लता एकनाथ शिंदे’ यांनी लता शिंदे(lata eknath shinde) यांचा आज ११ जुलै रोजी वाढदिवस आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या साठी एक भावनिक पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हे ही वाचा – धनुष्यबाण चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाकडे, शिवसेनेकडून कॅव्हेट दाखल

एकनाथ शिंदे(eknath shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर त्यांनी कामाचा धडाकाच लावला आहे. एकनाथ शिंदे यांचं संपूर्ण कुटुंब आता मुख्यमंत्र्यांचे कुटुंब म्हणून ओळखले जाते. एकनाथ शिंदे यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासात त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी त्यांना महत्वाची साथ दिली. लता शिंदे(lata shinde) या एकनाथ शिंदे यांच्या संपूर्ण प्रवासाच्या साक्षीदार आहेत. आज लता शिंदे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नीसाठी एक खास पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी एकनाथ शिंदे भावुक झाले.

हे ही वाचा –  राज ठाकरे उद्यापासून मनसे पदाधिकारी – कार्यकर्त्यांना करणार ऑनलाईन मार्गदर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM eknath shinde) यांनी त्यांच्या पत्नीसाठी एक भावनिक पोस्ट सुद्धा लिहिली. ही पोस्ट त्यांनी ट्विटर वरून पोस्ट केली. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या पोस्ट मध्ये ते म्हणाले, की ”जीवनातील बिकट व प्रतिकूल परिस्थितीत माझ्या पाठीशी तु खंबीरपणे उभी राहिलीस,सामाजिक, राजकीय जीवनात मी समर्पित होऊन कार्यरत असताना आपल्या संसाराचा गाडा जबाबदारीने व अतिशय मायेने हाकलास.तुझ्यासारखी सुजाण,सुज्ञ, मनमिळाऊ पत्नी लाभणे हे माझे बलवत्तर नशीब समजतो. लता,वाढदिवसाच्या शुभेच्छा.”

हे ही वाचा –  ‘राज्याची प्रगती व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विठ्ठलाला साकडं

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जेव्हा ते पाहिल्याचं ठाण्यात आले तेव्हा शिंदे समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी लता शिंदे यांनी ढोल ताशा वाजविणाऱ्या युवकांच्या टीम मध्ये जाऊन स्वतः ड्रम वाजवून जल्लोष केला. लता शिंदे यांचा उत्साह आणि जल्लोष पाहून शिंदे समर्थकांमधेही उत्साह पसरला. त्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा पहिल्यांदा जेव्हा मुख्यमंत्री दालनात गेले तेव्हा लता शिंदे आणि संपूर्ण शिंदे कुटुंब तिथे उपस्थित होते. त्यानांतर आशादी एकादशीच्या(ashadhi ekdashi) दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM eknatah shinde) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी विठ्ठलाची शासकीय पूजा सुद्धा विधिवत केली.

हे ही वाचा – उद्धव ठाकरेंवरील टीकेवर शिंदे गट नाराज; पण भाजपाकडून टीकास्त्र सुरूच